आली लहर केला कहर..! राखी सावंतने PM नरेंद्र मोदींचा फोटो असलेला ड्रेस परिधान करून माजवली होती खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 17:00 IST2020-07-21T16:59:21+5:302020-07-21T17:00:01+5:30
राखी सावंत बऱ्याचदा वादग्रस्त विधान व पोस्टमुळे चर्चेत येत असते. एकदा तर चक्क तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेला ड्रेस परिधान करून खळबळ माजवली होती.

आली लहर केला कहर..! राखी सावंतने PM नरेंद्र मोदींचा फोटो असलेला ड्रेस परिधान करून माजवली होती खळबळ
बॉलिवूडची कॉन्ट्रोव्हर्शियल गर्ल राखी सावंत बऱ्याचदा वादग्रस्त विधान व पोस्टमुळे चर्चेत येत असते. ती चर्चेत राहण्यासाठी एकही संधी सोडत नाही. त्यासाठी ती काहीही करायला तयार असते. एकदा तर तिच्यावरील मोदी फिव्हर पहायला मिळाला होता. त्यावेळी तर चक्क तिने पंतप्रधाननरेंद्र मोदी यांचा फोटो असलेला ड्रेस परिधान करून खळबळ माजवली होती.
खरंतर हे प्रकरण आहे 2014 सालचे. जेव्हा गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्षाकडून पंतप्रधान पदाचे दावेदार होते. अशात राखीची इच्छा होती की यावेळी निवडणूक मोदींनीच जिंकली पाहिजे. कारण ती त्यांची खूप मोठी चाहती आहे. अशात नरेंद्र मोदी यांच्यावरील समर्थन दर्शवण्यासाठी राखी सावंतने त्यांचा फोटो असणारा ड्रेस परिधान केला होता. त्यामुळे ती देशातच नाही तर जगभरात चर्चेत आली होती.
राखी सावंतने अमेरिकेत एका प्री इंडिपेंडेन्स पार्टीत एक ब्लॅक ड्रेस घातला होता. ज्यावर भाजप नेते मोदी यांचा फोटो होता. या ड्रेसवर राखीने भगव्या रंगाची पगडी व पिंक रंगाचे बूट्स घातले होते. हा ड्रेस घातल्यामुळे राखी ट्रोल झाली होती आणि तिला ट्रोलर्सचा सामना करावा लागला होता. इतकेच नाही तर तिच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती. ज्यावेळी तिला विचारण्यात आले की मोदींचा फोटो असलेला ड्रेस का परिधान केला. त्यावर ती म्हणाली की हे मोदीजींवरील तिचे प्रेम आहे.
इतकेच नाही तर ऑनलाइन पोर्टलशी बोलताना राखी म्हणाली होती की, तिचे पंतप्रधानांवर प्रेम होते. ज्याप्रकारे पंतप्रधानांचा आपल्या नागरिकांवर अधिकार असतो त्याचप्रमाणे नागरिकांचाही पंतप्रधानांवर अधिकार आहे. राखीने पुढे सांगितले होते की, ती अमेरिकेत भारताचे स्वातंत्र्य साजरे करत होती. अशात तिथे ती भारत आणि भारताचे पंतप्रधान दोघांचे प्रतिनिधित्व करत होती. त्यासाठी तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेला ड्रेस निवडला होता. त्यावेळी राखीने लोकांना ड्रेसवर आपला वेळ वाया घालवू नये असा सल्लाही दिला होता.