Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, पण स्थावर संपत्तीच्या कामात सावध रहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 07:39 IST2025-12-21T07:38:17+5:302025-12-21T07:39:23+5:30

Daily Horoscope Marathi: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?

Today's Horoscope, December 21, 2025: There will be financial gains, but be careful in real estate dealings | Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, पण स्थावर संपत्तीच्या कामात सावध रहा

Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, पण स्थावर संपत्तीच्या कामात सावध रहा

मेष: अस्वास्थ्य व कटकटीचा अनुभव येईल. शरीरास आळस व थकवा जाणवेल तर मन अशांत राहील. आज संताप वाढल्याने कामे बिघडतील. आपला प्रत्येक प्रयत्न चुकीच्या मार्गाने होण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा

वृषभ: आजचा दिवस काळजीपूर्वक राहण्याचा आहे. नवीन कार्याचा आरंभ शक्यतो टाळावा. स्वास्थ्य बिघडू शकते. कार्यालयात कामाचा व्याप वाढल्याने अधिक थकवा जाणवेल. प्रवास लाभदायी होणार नाहीत.
आणखी वाचा

मिथुन: आजचा दिवस आनंददायी आहे. शरीर व मन आनंदी राहील. स्वादिष्ट भोजन मिळेल. नव्या कपड्यांची खरेदी होईल. वाहनसौख्य मिळेल. आपल्या मान - सन्मानात व लोकप्रियतेत वाढ होईल.
आणखी वाचा

कर्क: आजचा दिवस व्यापार - व्यवसायात फायदा मिळवून देणारा आहे. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. शत्रूवर विजय मिळेल. चालू कामात यश मिळेल. खर्चाचे प्रमाण मात्र वाढेल.
आणखी वाचा

सिंह: आजचा दिवस नवनिर्माण व कला ह्या साठी उत्तम आहे. प्रकृती उत्तम राहिली तरी सुद्धा रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य टिकेल. 
आणखी वाचा

कन्या: आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. पत्नी बरोबर वाद किंवा मतभेद होतील. आईच्या तब्येतीची काळजी वाटेल. स्थावर संपत्तीच्या कामात सावध राहावे. 
आणखी वाचा

तूळ: आजचा दिवस आनंदात जाईल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. एखाद्या प्रवासाने मनाला आनंद मिळेल. आपसातील संबंध सुधारतील. 
आणखी वाचा

वृश्चिक: आज आपणास जर कौटुंबिक वातावरणात शांतता हवी असेल तर वाणीवर संयम ठेवावा लागेल. आपल्या वागणुकीचा कोणास त्रास होऊ नये म्हणून म्हणून वर्तन सुद्धा संयमित ठेवा. नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. 
आणखी वाचा

धनु: आज निर्धारित केलेली सर्व कार्ये पूर्ण होतील. आर्थिक लाभ होतील. आपली माणसे भेटल्याचा आनंद होईल. स्नेहीजनां कडील मांगलिक प्रसंगात सहभागी व्हाल. यश - कीर्ती वाढीस लागेल. 
आणखी वाचा

मकर: आज मन अस्वस्थ राहील. एखाद्या मांगलिक किंवा सामाजिक कार्यासाठी पैसा खर्च होईल. धनहानी व मानहानीची शक्यता आहे. कोर्ट- कचेरीच्या कामात अपयश येईल. वाणीवर ताबा ठेवावा लागेल. 
आणखी वाचा

कुंभ: आज आपणांस मिळणार्‍या फायदयामुळे आपला आनंद द्विगुणित होईल. नव्या कार्यासाठी केलेला प्रारंभ कार्यसिद्धीच्या दृष्टीने शुभ आहे. व्यापारी वर्गाला व्यापारात फायदा होईल. प्राप्तीत वाढ होईल. 
आणखी वाचा

मीन: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नोकरी - व्यवसायात यश मिळेल. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश झाल्यामुळे आपल्या मनाची प्रसन्नता वाढेल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील.
आणखी वाचा

Open in app

Web Title : आज का राशिफल, 21 दिसंबर 2025: आर्थिक लाभ, संपत्ति में सावधानी

Web Summary : आज मिश्रित भाग्य है। मिथुन राशि वालों को खुशी, कर्क राशि वालों को व्यवसाय में लाभ। कन्या राशि वालों को संपत्ति में सावधान रहना चाहिए। धनु राशि वालों को आर्थिक लाभ। कुंभ राशि वालों को अधिक खुशी और मुनाफा। सावधानी से आगे बढ़ें।

Web Title : Horoscope Today, December 21, 2025: Financial gains, property caution advised.

Web Summary : Mixed fortunes today. Gemini enjoys happiness, Cancer sees business gains. Virgo should be cautious with property. Sagittarius benefits financially. Aquarius experiences increased happiness and profits. Proceed cautiously and stay alert.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.