आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 07:37 IST2025-12-12T07:36:24+5:302025-12-12T07:37:21+5:30
Today's Horoscope: आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, घेतलेले निर्णय पूर्णत्वास जातील का, घरातील वातावरण कसे असेल, तुमची रास काय सांगतेय?

आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
मेष : आपण एखाद्या काल्पनिक विश्वात रमून जाल. घरातील वातावरण आनंदी राहील. दैनंदिन कार्यात मात्र काही अडचणी निर्माण होतील. नोकरीत वरिष्ठांशी मतभेद संभवतात. परिश्रमाचे अपेक्षित यश मिळू शकणार नाही.
आणखी वाचा
वृषभ : आज आपणास वाणी व वर्तन ह्यावर संयम ठेवावा लागेल. अपघाताच्या शक्यतेमुळे जलाशया पासून दूर राहावे. जमीन किंवा संपत्तीच्या दस्तावेजात फसवणूक होण्याची शक्यता असल्याने सही करताना काळजी घ्यावी लागेल. दुपार नंतर परिस्थितीत सुधारणा होईल.
आणखी वाचा
मिथुन : भावंडांशी सौहार्दता निर्माण झाल्याने आपला फायदा होईल. दुपार नंतर मात्र मनावर नकारात्मक विचारांचा पगडा बसेल. घरातील वातावरण प्रतिकूल राहील. जमीन वा इतर कागदपत्रांवर विचारपूर्वक सही करा.
आणखी वाचा
कर्क : आजचा दिवस लाभदायी आहे. घरातील सर्वांचे सहकार्य मिळेल. बोलण्याच्या सुंदर शैलीमुळे आपली कामे सहजपणे पूर्ण होतील. सहकार्यांशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित होतील.
आणखी वाचा
सिंह : आज आपली कार्य पद्धती खंबीर मनोबलयुक्त राहील. मोठया लोकांकडून लाभ होतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. खर्च नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करा. दूर राहणारे स्वकीय व मित्र यांच्याशी खूप कालावधी नंतर होणारा एखादा व्यवहार आज आनंददायी व लाभदायी ठरेल.
आणखी वाचा
कन्या : भावनेच्या भरात चुकीचे पाऊल पडेल. गैरसमज दूर करावे लागतील. एखादा वाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. प्राप्तीच्या प्रमाणात खर्च वाढेल. आरोग्याच्या बाबतीत असमाधानच राहील.
आणखी वाचा
तूळ : आज कार्यात अडचणी येण्याची शक्यता असल्याने नवे कार्य हाती न घेणे हितावह राहील. मित्रांकडून विशेष लाभ होतील. व्यापारात नफा संभवतो. काळजीमुळे मनस्वास्थ्यावर नकारात्मक प्रभाव पडेल. उक्ती आणि कृती यांत संयम बाळगा. खर्च वाढेल.
आणखी वाचा
वृश्चिक : आज व्यावसायिक क्षेत्रात आपल्या कामाची खूप प्रशंसा होईल. सरकारी कामकाजात लाभ होईल. गृहस्थ जीवनात गोडी राहील. स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी दिवस अनुकूल आहे.
आणखी वाचा
धनु : आज प्रकृती अस्वास्थ्यामुळे स्वभावातील चिडचिडेपणा वाढेल. एखादा प्रवास संभवतो. व्यवसायात त्रास किंवा वाद होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी अनुकूल आहे. पित्याकडून लाभ होईल.
आणखी वाचा
मकर : आज आजारपणावर खर्च करावा लागेल. अचानक धन खर्चाची शक्यता आहे. कुटुंबियांशी मोठा वाद संभवतो. चारित्र्यावर शिंतोडे उडतील असे कार्य करू नका.
आणखी वाचा
कुंभ : आज व्यापारी आणि भागीदार यांच्याबरोबर जपून वागावे लागेल. वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होईल. नोकरीत वरिष्ठांशी वाद संभवतो. खूप परिश्रम करुनही अपेक्षित प्राप्ती होणार नाही.
आणखी वाचा
मीन : आजचा आपला दिवस मध्यम फलदायी आहे. कुटुंबातील व्यक्तींशी सुसंवाद राहील. दैनंदिन कामास विलंब होईल. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद संभवतात. जोडीदाराच्या प्रकृतीची चिंता निर्माण होईल.
आणखी वाचा
