Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १० डिसेंबर २०२५: दागिने, वाहन प्राप्ती होणार, वादामुळे हानी होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 07:28 IST2025-12-10T07:25:50+5:302025-12-10T07:28:22+5:30

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?

Today's horoscope, December 10, 2025: You will receive jewelry, a vehicle, there is a possibility of loss due to disputes. | Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १० डिसेंबर २०२५: दागिने, वाहन प्राप्ती होणार, वादामुळे हानी होण्याची शक्यता

Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १० डिसेंबर २०२५: दागिने, वाहन प्राप्ती होणार, वादामुळे हानी होण्याची शक्यता

मेष: आपल्या तापट स्वभावावर आज नियंत्रण ठेवणे हितावह राहील. मानसिक थकवा जाणवेल. कष्टाच्या मानाने प्राप्ती कमी होईल. संतती विषयी काळजी राहील.
आणखी वाचा 

वृषभ: आज आपण कोणतेही कार्य खंबीर मनोबल व दृढ आत्मविश्वास ह्यांच्या जोरावर पूर्ण कराल. पैतृक घराण्याकडून आपणाला लाभ होईल. सरकारी कामात आर्थिक यश मिळेल. 
आणखी वाचा 

मिथुन: आज दिवसाच्या प्रारंभी उत्साह व स्फूर्ती जाणवेल. प्रगतीच्या संधी येतील. झटपट बदलणारे विचार आपणास अडचणीत टाकतील. नवीन कामे सुरू करू शकाल. आज आपणाला काही लाभ होण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा 

कर्क: आज मनात निराशा असल्यामुळे खिन्नता अनुभवाल. कुटुंबियांशी मतभेद व गैरसमज होतील. धनखर्च वाढेल. असंतोषाच्या भावनेने मन घेरले जाईल. 
आणखी वाचा 

सिंह: आत्मविश्वास व झटपट निर्णय घेऊन कामात आघाडीवर राहाल. समाजात मान - प्रतिष्ठा वाढेल. उक्ती व कृतीतील उग्रपणा व अहंपणा ह्यामुळे संघर्ष होण्याची शक्यता आहे. वडील व वडीलधार्‍यां कडून लाभ होईल.
आणखी वाचा 

कन्या: आज शारीरिक व मानसिक चिंता बेचैन करतील. एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल. अचानक धनखर्च होईल. दांपत्य जीवनात कटुता निर्माण होईल.
आणखी वाचा 

तूळ: आज कौटुंबिक जीवनात सुख व आनंद मिळेल. उत्पन्न वाढ संभवते. कामाच्या जागी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. बढती मिळण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गाला लाभकारक व्यापार होईल. वैवाहिक सुख उत्तम मिळेल.
आणखी वाचा 

वृश्चिक: आज आपली सर्व कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. संसारात आनंद व समाधान राहील. समाजात मान - प्रतिष्ठा मिळेल. आरोग्य उत्तम राहील. वरिष्ठ व वडिलधार्यांची मर्जी राहील. येणी वसूल होतील.
आणखी वाचा 

धनु: आज काही कारणाने आपण अडचणीत सापडाल. कोणतेही काम करण्यात उत्साह वाटणार नाही.  नोकरी - व्यवसायात त्रास जाणवेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी वाद - विवाद केल्याने हानी होण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा 

मकर: आज नकारात्मक विचारां पासून दूर राहा व खाण्या- पिण्याकडे चांगले लक्ष द्या. अचानक खर्च वाढेल. औषधोपचारावर पैसा खर्च होईल. व्यापारात भागीदारांशी मतभेद वाढतील.
आणखी वाचा 

कुंभ: प्रणय, प्रेमालाप, प्रवास, पर्यटन, मनोरंजन हे आजच्या दिवसाचा भाग बनतील. मित्र व कुटुंबीयांसह भोजनासाठी बाहेर जाऊ शकाल. उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा 

मीन: आज दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील. घरात सुख शांती नांदेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. सहकार्‍यांचे सहकार्य आपले व्यावसायिक काम सरळ बनवतील. मातुल घराण्या कडून लाभ होईल.
आणखी वाचा 

Open in app

Web Title: Today's horoscope, December 10, 2025: You will receive jewelry, a vehicle, there is a possibility of loss due to disputes.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.