आजचे राशीभविष्य, १३ जानेवारी २०२६: नोकरी, व्यवसायात लाभ, नशिबाची साथ; अनुकूल दिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 06:59 IST2026-01-13T06:52:36+5:302026-01-13T06:59:46+5:30
Today Daily Horoscope Tuesday 13 January 2026: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

आजचे राशीभविष्य, १३ जानेवारी २०२६: नोकरी, व्यवसायात लाभ, नशिबाची साथ; अनुकूल दिवस
Today Daily Horoscope:
मेष: आज संपूर्ण दिवस आप्तेष्टांसह हर्षोल्हासात घालवू शकाल. नव्या वस्त्रांची व दागिन्यांची खरेदी करू शकाल. सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान होतील. दुपारनंतर संयमित राहावे लागेल. नव्या ओळखी विचारपूर्वक कराव्यात. खर्चात वाढ होईल. एखादे नुकसान संभवते. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आपल्या कृती नियंत्रित ठेवा. आणखी वाचा
वृषभ: आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. व्यवसायात सहकारी आपणांस मदत करतील. दुपारनंतर मनोरंजनाचा आनंद लुटाल. एखाद्या सहलीचा बेत ठरवू शकाल. भागीदारांशी मतभेद संभवतात. आणखी वाचा
मिथुन: आजचा आपला दिवस बौद्धिक कामे व चर्चा करण्यात जाईल. आपल्या कल्पनाशक्तिस वाव मिळेल. शारीरिक व मानसिक आरोग्यास मात्र जपावे लागेल. दुपारनंतर व्यवसायात लाभ संभवतो. कुटुंबात शांतता नांदेल. आणखी वाचा
कर्क: आज शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रवासात त्रास संभवतो. जमीन व वाहन या विषयीच्या समस्या भेडसावतील. दुपारनंतर परिस्थितीत बदल होईल. शांतता लाभेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. शारीरिक उत्साह वाढेल. अती विचाराने मन विचलित होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
सिंह: आजचा दिवस प्रवासास अनुकूल आहे. परदेशस्थ नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी मिळू शकेल. धनलाभ संभवतो. नवीन कार्य हाती घेऊ शकाल. दुपारनंतर सहनशीलता दिसून येईल. नैराश्य येण्याची शक्यता आहे. कौटुंबिक किंवा संपत्ती संबंधी एखादी समस्या उद्भवेल. आणखी वाचा
कन्या: आज आपली मानसिक स्थिती द्विधा असल्याने नवीन कार्याचा आरंभ करण्यात त्रास होईल. कुटुंबियांशी वाद होऊन मन दुखावले जाण्याची शक्यता असल्याने वक्तव्यावर संयम ठेवावा लागेल. दुपारनंतर मात्र अनुकूल वातावरण निर्माण होईल. भावंडांशी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करू शकाल. प्रवासासाठी दिवस अनुकूल आहे. नशिबाची साथ लाभेल. आणखी वाचा
तूळ: आज दृढ विचार व वैचारिक संतुलन ह्यामुळे हाती घेतलेले काम सहजपणे पूर्ण करू शकाल. वस्त्रालंकार व मनोरंजन ह्यासाठी पैसा खर्च होईल. दुपारनंतर द्विधा मनःस्थिती होईल. त्यामुळे निर्णय घेणे अवघड होईल. शक्यतो कुटुंबियांशी मतभेद टाळावेत. अहंपणा बाजूला ठेवून व्यावहारिक निर्णय घेणे हितावह राहील. आणखी वाचा
वृश्चिक: आज आपला संतापीपणा व अविचारीपणा ह्यामुळे आपण अडचणीत येण्याची शक्यता आहे. एखादी अप्रिय घटना संभवते. दुपारनंतर शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक बाबींचे योग्य नियोजन करू शकाल. आपला आत्मविश्वास वाढीस लागेल. आणखी वाचा
धनु: आजचा दिवस व्यापार - व्यवसायासाठी लाभदायी आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नोकरीत बढती संभवते. मित्रांसह सहलीस जाऊ शकाल. व्यापारात लाभ होईल. दुपारनंतर विचारपूर्वक कामे न केल्यास अडचणीत येऊ शकाल. व्यावसायिक क्षेत्रात वावरताना आपले वक्तव्य संयमित ठेवावे. आणखी वाचा
मकर: कौटुंबिक जीवनाच्या दृष्टिने आजचा दिवस आनंददायी आहे. व्यापार -व्यवसायात वृद्धी संभवते. व्यवसायात अनुकूलता जाणवेल. सहकारी उत्तम सहकार्य करतील. दुपारनंतर मित्रांसह सहलीस जाऊ शकाल. प्राप्तीत वाढ संभवते. व्यापारात लाभ होतील. आणखी वाचा
कुंभ: आज आपण बौद्धिक काम, नवनिर्मिती व लेखनकार्यात व्यस्त राहाल. नवीन काम सुरू करू शकाल. एखाद्या प्रवासाचे आयोजन करू शकाल. व्यापारात लाभाच्या संधी लाभतील मात्र त्या फसव्या असण्याची शक्यता आहे. दुपारनंतर मात्र कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होईल. एखादा लाभ संभवतो. उत्तम सौख्य लाभेल. शासकीय कामात यश प्राप्ती होईल. आणखी वाचा
मीन: आज आपणाला आपल्या कृतीवर संयम ठेवावा लागेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. गूढ विद्येची आवड निर्माण होईल. दुपारनंतर परदेशात वास्तव्यास असणार्या मित्र परिवाराकडून एखादी चांगली बातमी मिळेल. व्यापार-व्यवसायात अपेक्षित सहकार्य मिळू शकेल. शक्यतो आज वाद टाळावेत. आणखी वाचा
