आजचे राशीभविष्य, २५ सप्टेंबर २०२२; नोकरी-व्यवसायात प्रगतीचा मार्ग मोकळा होईल, उत्पन्न वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2022 07:22 IST2022-09-25T07:21:13+5:302022-09-25T07:22:10+5:30

Today's Horoscope 25 September 2022, Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope, September 25, 2022;Job - The way of progress in business will be paved, income will increase | आजचे राशीभविष्य, २५ सप्टेंबर २०२२; नोकरी-व्यवसायात प्रगतीचा मार्ग मोकळा होईल, उत्पन्न वाढेल

आजचे राशीभविष्य, २५ सप्टेंबर २०२२; नोकरी-व्यवसायात प्रगतीचा मार्ग मोकळा होईल, उत्पन्न वाढेल

मेष - चंद्र सिंह राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी असेल. आज स्वभावातील तापटपणा व हट्टीपणा ह्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कष्ट घेऊनही अपेक्षित यश न मिळाल्याने मन उदास होईल. शारीरिक अशक्तपणा जाणवेल. आजचा दिवस प्रवासासाठी अनुकूल नाही. संतती विषयक काळजी निर्माण होईल. आणखी वाचा 

वृषभ - आज आपल्या कार्यातील यशात दृढ मनोबल व खंबीर आत्मविश्वास ह्यांची भूमिका महत्वाची राहील. वडील घराण्या कडून लाभ होईल. विद्यार्थिवर्गाची अभ्यासात गोडी लागेल. सरकारी कामात यश व फायदा मिळेल. संततीसाठी पैसा खर्च करावा लागेल. कलाकार, खेळाडू ह्यांना आपले कौशल्य दाखविण्यास अनुकूलता लाभेल. आणखी वाचा 

मिथुन -आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी असेल. आज दिवसाच्या प्रारंभी उत्साह व स्फूर्ती जाणवेल. प्रगतीच्या संधी येतील. झटपट बदलणारे विचार आपणास अडचणीत टाकतील. नवीन कामे सुरू करू शकाल. मित्र, नातेवाईक व शेजारी - पाजारी ह्यांच्याशी सलोख्याचे संबंध राहतील. आणखी वाचा 

कर्क - आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी असेल. आज मनात निराशा असल्यामुळे खिन्नता अनुभवाल. कुटुंबियांशी मतभेद व गैरसमज होतील. अहंपणा मुळे इतर कोणाच्या भावना दुखवाल. विद्यार्थ्यांचे अभ्यासावर चित्त एकाग्र होणार नाही. धनखर्च वाढेल. आणखी वाचा 

सिंह - आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आत्मविश्वास व झटपट निर्णय घेऊन कामात आघाडीवर राहाल. समाजात मान - प्रतिष्ठा वाढेल. उक्ती व कृतीतील उग्रपणा व अहंपणा ह्यामुळे संघर्ष होण्याची शक्यता आहे. वडील व वडीलधार्‍यां कडून लाभ होईल. प्रकृतीची थोडी कुरकुर राहील. आणखी वाचा 

कन्या - आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक चिंता बेचैन करतील. एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल. अचानक धनखर्च होईल. दांपत्य जीवनात कटुता निर्माण होईल. मानसिक व शारीरिक अस्वास्थ्य राहील. आणखी वाचा

तूळ - आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी असेल. आज कौटुंबिक जीवनात सुख व आनंद मिळेल. उत्पन्न वाढ संभवते. कामाच्या जागी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. बढती मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबीय व मित्रांच्या सहवासात खुश राहाल. प्रवास आनंददायी होईल. आणखी वाचा 

वृश्चिक - आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी असेल. आज कौटुंबिक जीवनाची सार्थकता आपल्या लक्षात येईल. घरात आनंदाचे वातावरण राहील. प्रत्येक काम विनासायास पार पडेल. व्यापार्‍याना व्यापारात चांगल्या संधी प्राप्त होतील. उत्पन्न वाढेल. नोकरी - व्यवसायात प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. उच्च अधिकारी व वडीलधार्‍यांचा सहवास लाभून त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळेल. आणखी वाचा 

धनु - आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज काही कारणाने आपण अडचणीत सापडाल. कोणतेही काम करण्यात उत्साह वाटणार नाही. शारीरिक व मानसिक व्यग्रता राहील. वेळ काळजीत जाईल. नोकरी - व्यवसायात त्रास जाणवेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी वाद - विवाद केल्याने हानी होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा 

मकर - आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज नकारात्मक विचारां पासून दूर राहा व खाण्या- पिण्याकडे चांगले लक्ष द्या. अचानक खर्च वाढेल. औषधोपचारावर पैसा खर्च होईल. व्यापारात भागीदारांशी मतभेद वाढतील. क्रोध व आवेशावर नियंत्रण ठेवा. सार्वजनिक कामा निमित्त प्रवास करावा लागेल. आणखी वाचा  

कुंभ - आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस प्रणयाराधनेसाठी अनुकूल आहे. प्रत्येक काम आपण आत्मविश्वापूर्वक कराल. प्रवास, सहलीची शक्यता आहे. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेण्याची व नवीन वस्त्रपरिधान करण्याची संधी लाभेल. आणखी वाचा 

मीन - आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपले मनोबल व आत्मविश्वास दृढ असेल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. घरात सुखशांती नांदेल. स्वभावातील तापटपणा संयमित ठेवावा लागेल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल.  आणखी वाचा 

Web Title: Today's Horoscope, September 25, 2022;Job - The way of progress in business will be paved, income will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app