आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२२: 'या' राशीच्या लोकांना कामात यश व आर्थिक लाभाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 07:33 IST2022-12-25T07:33:03+5:302022-12-25T07:33:38+5:30
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२२: 'या' राशीच्या लोकांना कामात यश व आर्थिक लाभाची शक्यता
मेष: चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशी पासून भाग्यात भावात असेल. आज आपण ठरविलेले काम सहज पूर्ण कराल, परंतु आपण जो प्रयत्न करीत आहात तो चुकीच्या दिशेने होत आहे असे वाटत राहील. एखाद्या मंगल कार्याला उपस्थिती लावाल. प्रवास संभवतो. रागावर ताबा ठेवावा लागेल. आणखी वाचा
वृषभ: आज कामाचा खूप व्याप व खाण्या - पिण्याची बेपर्वाही यामुळे आरोग्य बिघडेल. वेळेवर जेवण व झोप न झाल्याने मानसिक बेचैनी वाटेल. प्रवासात विघ्न येण्याची शक्यता असल्याने प्रवास करू नका. नियोजित वेळेत काम पूर्ण न झाल्याने रोष ओढवून घ्याल. आणखी वाचा
मिथुन: आजच्या दिवसाचा प्रारंभ आरामदायी व प्रसन्न वातावरणात होईल. पाहुणे व मित्रांच्या सहवासात मेजवानी, सहल, किंवा मनोरंजनाचा बेत ठरवाल. नवे कपडे, दागीने व वाहन खरेदी करू शकाल. मन आनंदाने भरून जाईल. भिन्नलिंगी व्यक्तीचे आकर्षण राहील. सार्वजनिक जीवनात सन्मान मिळेल व लोकप्रियता वाढेल. आणखी वाचा
कर्क: आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा राहील. कुटुंबियांना वेळ देऊ शकाल. त्यांच्या सहवासात घरात वेळ घालवाल. कार्यात सफलता मिळेल. नोकरदारांना नोकरीत लाभ होईल. सहकारी सहकार्य करतील. प्रकृती उत्तम राहील. आणखी वाचा
सिंह: आज आपण शारीरिक व मानसिक दृष्टया स्वस्थ राहाल. आंतरिक सृजनशीलता नवीन स्वरूपात व्यक्त होईल. साहित्य लेखनात नवीन कार्य प्रदान कराल. प्रिय व्यक्तीचा सुखद सहवास लाभेल. संततीच्या प्रगतीच्या बातम्या मिळतील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आणखी वाचा
कन्या: आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. कशातही उत्साह वाटणार नाही. मन चिंतीत राहील. पत्नी बरोबर वाद किंवा मतभेद होतील. आईच्या तब्येतीची काळजी वाटेल. आणखी वाचा
तूळ: आजचा दिवस आनंदात जाईल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. प्रत्येक कामात यश मिळेल. स्वकीय भेटतील. मन आनंदी राहील. एखाद्या प्रवासाने मनाला आनंद मिळेल. आणखी वाचा
वृश्चिक: आज आपणास जर कौटुंबिक वातावरणात शांतता हवी असेल तर वाणीवर संयम ठेवावा लागेल. आपल्या बोलण्याने एखाद्याचे मन दुखावले जाईल. आपल्या वागणुकीचा कोणास त्रास होऊ नये म्हणून म्हणून वर्तन सुद्धा संयमित ठेवा. नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. स्वास्थ्य बिघडेल, मन उद्विग्न होईल. आणखी वाचा
धनु: आज आपल्या कामात यश व आर्थिक लाभाची शक्यता आहे. एकादया मंगल कार्यास सहकुटुंब हजर राहाल. प्रवासाची शक्यता आहे. स्वकीयांची भेट आपणाला आनंदित करील. दांपत्य जीवनात जवळीक व गोडी निर्माण होईल. आणखी वाचा
मकर: आज आपण एखाद्या मंगल कार्यांत मग्न राहाल. परोपकारी कार्यांवर पैसा खर्च होईल. नातलग, संबंधित व कुटुंबीय यांच्याशी जपून बोला कारण आपले बोलणे कोणाचे मन दुखावण्याची शक्यता आहे. खूप कष्ट व कमी यश यामुळे निराशा निर्माण होईल. आणखी वाचा
कुंभ: आज नवे काम हाती घेऊ शकाल. नोकरी - व्यवसायात लाभ होऊन अतिरिक्त प्राप्ती होईल. मित्रगण विशेषतः स्त्री वर्गाकडून लाभ होईल. सामाजिक क्षेत्रात आपणाला प्रसिद्धी व प्रतिष्ठा मिळेल. पत्नी व संतती कडून सुख समाधान लाभेल. एखादा प्रवास किंवा सहल संभवते. आणखी वाचा
मीन: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कामातील यश व वरिष्ठ अधिकार्यांचे प्रोत्साहन आपला उत्साह द्विगुणित करेल. व्यापारी वर्गाला व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल. येणी वसूल होतील. वडील व वडीलधार्यांकडून लाभ होईल. प्रकृती उत्तम राहील. आणखी वाचा
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"