आजचे राशीभविष्य - 16 डिसेंबर 2022; झटपट बदलणारे विचार आपणास अडचणीत टाकतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 07:32 IST2022-12-16T07:32:08+5:302022-12-16T07:32:41+5:30

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope - December 16, 2022; Quick thinking will get you into trouble | आजचे राशीभविष्य - 16 डिसेंबर 2022; झटपट बदलणारे विचार आपणास अडचणीत टाकतील

आजचे राशीभविष्य - 16 डिसेंबर 2022; झटपट बदलणारे विचार आपणास अडचणीत टाकतील

मेष - सिंह राशीचा चंद्र आज आपल्या पाचवा स्थानी असेल. आज स्वभावातील तापटपणा व हट्टीपणा ह्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कष्ट घेऊनही अपेक्षित यश न मिळाल्याने मन उदास होईल. शारीरिक अशक्तपणा जाणवेल. आजचा दिवस प्रवासासाठी अनुकूल नाही. आणखी वाचा 

वृषभ - आज आपल्या कार्यातील यशात दृढ मनोबल व खंबीर आत्मविश्वास ह्यांची भूमिका महत्वाची राहील. वडील घराण्या कडून लाभ होईल. विद्यार्थिवर्गाची अभ्यासात गोडी लागेल. सरकारी कामात यश व फायदा मिळेल. संततीसाठी पैसा खर्च करावा लागेल. आणखी वाचा

मिथुन - आज दिवसाच्या प्रारंभी उत्साह व स्फूर्ती जाणवेल. प्रगतीच्या संधी येतील. झटपट बदलणारे विचार आपणास अडचणीत टाकतील. नवीन कामे सुरू करू शकाल. मित्र, नातेवाईक व शेजारी - पाजारी ह्यांच्याशी सलोख्याचे संबंध राहतील. आणखी वाचा

कर्क -आज मनात निराशा असल्यामुळे खिन्नता अनुभवाल. कुटुंबियांशी मतभेद व गैरसमज होतील. अहंपणामुळे इतर कोणाच्या भावना दुखवाल. विद्यार्थ्यांचे अभ्यासावर चित्त एकाग्र होणार नाही. धनखर्च वाढेल. आणखी वाचा

सिंह - आत्मविश्वास व झटपट निर्णय घेऊन कामात आघाडीवर राहाल. समाजात मान - प्रतिष्ठा वाढेल. उक्ती व कृतीतील उग्रपणा व अहंपणा ह्यामुळे संघर्ष होण्याची शक्यता आहे. वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल. प्रकृतीची थोडी कुरकुर राहील. आणखी वाचा

कन्या - आज शारीरिक व मानसिक चिंता बेचैन करतील. एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल. अचानक धनखर्च होईल. दांपत्य जीवनात कटुता निर्माण होईल. मानसिक व शारीरिक अस्वास्थ्य राहील. आणखी वाचा

तूळ - आज कौटुंबिक जीवनात सुख व आनंद मिळेल. उत्पन्न वाढ संभवते. कामाच्या जागी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. बढती मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबीय व मित्रांच्या सहवासात खुश राहाल. प्रवास आनंददायी होईल. आणखी वाचा 

वृश्चिक - आज कौटुंबिक जीवनाची सार्थकता आपल्या लक्षात येईल. घरात आनंदाचे वातावरण राहील. प्रत्येक काम विनासायास पार पडेल. व्यापार्‍याना व्यापारात चांगल्या संधी प्राप्त होतील. उत्पन्न वाढेल. नोकरी - व्यवसायात प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. आणखी वाचा

धनु -   आज काही कारणाने आपण अडचणीत सापडाल. कोणतेही काम करण्यात उत्साह वाटणार नाही. शारीरिक व मानसिक व्यग्रता राहील. वेळ काळजीत जाईल. नोकरी - व्यवसायात त्रास जाणवेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी वाद - विवाद केल्याने हानी होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा 

मकर - आज नकारात्मक विचारांपासून दूर राहा व खाण्या- पिण्याकडे चांगले लक्ष द्या. अचानक खर्च वाढेल. औषधोपचारावर पैसा खर्च होईल. व्यापारात भागीदारांशी मतभेद वाढतील. क्रोध व आवेशावर नियंत्रण ठेवा. सार्वजनिक कामानिमित्त प्रवास करावा लागेल. आणखी वाचा

कुंभ - आजचा दिवस प्रणयाराधनेसाठी अनुकूल आहे. प्रत्येक काम आपण आत्मविश्वापूर्वक कराल. प्रवास, सहलीची शक्यता आहे. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेण्याची व नवीन वस्त्रपरिधान करण्याची संधी लाभेल. आणखी वाचा

मीन -आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपले मनोबल व आत्मविश्वास दृढ असेल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. घरात सुखशांती नांदेल. स्वभावातील तापटपणा संयमित ठेवावा लागेल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope - December 16, 2022; Quick thinking will get you into trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app