आजचे राशीभविष्य - 12 सप्टेंबर 2022; कौटुंबिक वातावरण आनंदी राहील, पित्या कडून लाभ होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 07:51 IST2022-09-12T07:48:23+5:302022-09-12T07:51:01+5:30

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Monday 12 September 2022 | आजचे राशीभविष्य - 12 सप्टेंबर 2022; कौटुंबिक वातावरण आनंदी राहील, पित्या कडून लाभ होईल

आजचे राशीभविष्य - 12 सप्टेंबर 2022; कौटुंबिक वातावरण आनंदी राहील, पित्या कडून लाभ होईल

मेष - आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक अस्वास्थ्याचा अनुभव येईल. सर्दी, खोकला, ताप इत्यादींचा त्रास होईल. पारमार्थिक काम करताना दाम खर्च करावा लागेल. त्यामुळे खर्च वाढेल. मोहाच्या प्रलोभना पासून दूर राहणे योग्य ठरेल. जमीन, घर इत्यादींच्या कागदपत्रात फसवणूक होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

वृषभ - आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज आपली प्राप्ती व व्यापार ह्यात वाढ होईल. व्यापारात नवीन लाभदायक संपर्क वाढतील. कुटुंबीय व मित्रांसह हसण्या - खेळण्यात क्षण घालवण्याची संधी मिळेल. प्रवास - पर्यटनाचे योग आहेत. आज विशेषतः महिला वर्गाकडून लाभ होतील. आणखी वाचा

मिथुन - आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल. नोकरी - व्यवसायात आपल्या श्रमाचे चीज होत आहे असे वाटेल. वरिष्ठ प्रोत्साहन देतील. त्यामुळे आपला उत्साह वाढेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. आणखी वाचा

कर्क - आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल. विदेशी जाण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. विदेशातून चांगल्या बातम्या मिळतील. मंगल कार्य किंवा प्रवास ह्यावर खर्च होईल.आणखी वाचा 

सिंह - आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज खूप सावध राहावे लागेल. आज विपरित घटनांना तोंड द्यावे लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. प्रकृती बिघडल्याने अचानक खर्च करावा लागेल. कुटुंबियांशी संयमाने वागावे लागेल. आणखी वाचा

कन्या - आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. सामाजिक व अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल. उंची वस्त्रे व अलंकाराची खरेदी होईल. वाहनसौख्य मिळेल. भागीदारांशी चांगले संबंध राहातील. आणखी वाचा

तूळ - आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. घरातील सुखा - समाधानाचे वातावरण आपला आनंद वाढीस लावेल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. कामात यश प्राप्ती होईल. आणखी वाचा

वृश्चिक - आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज शक्यतो प्रवासाचे आयोजन करू नये. आरोग्य विषयक चिंता निर्माण होईल. संतती विषयक समस्या निर्माण होतील. मानभंग होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आणखी वाचा

धनु - आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज जास्त संवेदनशीलते मुळे कौटुंबिक गोष्टींत मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. द्विधा मनःस्थिती मुळे मनात चलबिचल वाढेल. आरोग्याच्या दृष्टीने पण दिवस चांगाल नाही. आईच्या तब्बेती विषयी विशेष खबरदारी घ्यावी लागेल. आणखी वाचा

मकर - आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज आपण शत्रूला पराभूत कराल. नवीन कार्यारंभासाठी तयार राहावे लागेल. सफलता मिळेल. प्रत्येक काम जीव लावून कराल. व्यापार - व्यवसायात लाभ होईल. शेअर - सट्ट्यातील गुंतवणूक लाभ देईल. आणखी वाचा

कुंभ - आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपल्या द्विधा मनःस्थितीमुळे कोणताही ठोस निर्णय आपण घेऊ शकणार नाही. महत्वाचे निर्णय आज घेऊ नका. वाणीवर ताबा न राहिल्याने कुटुंबियांशी मतभेद होतील. मंगल कार्यावर खर्च होईल. आणखी वाचा

मीन - आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस आनंद व उत्साहाने परिपूर्ण राहील. घरात एखादे मंगल कार्य ठरेल. नवे काम आरंभ करण्यास दिवस अनुकूल आहे. नातलग, संबंधित व मित्र यांच्याशी भेट - संवाद घडतील. आणखी वाचा

Web Title: Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Monday 12 September 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app