आजचे राशीभविष्य - ३० सप्टेंबर २०२२ : 'या' राशीच्या लोकांना भाग्याची मिळणार साथ, धनलाभाचेही योग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 07:47 IST2022-09-30T07:46:57+5:302022-09-30T07:47:57+5:30

Today's Horoscope : पाहा काय म्हणते तुमची राशी.

Todays Horoscope 30th September 2022 The people of this zodiac sign will get the support of luck and gain money profitable day | आजचे राशीभविष्य - ३० सप्टेंबर २०२२ : 'या' राशीच्या लोकांना भाग्याची मिळणार साथ, धनलाभाचेही योग

आजचे राशीभविष्य - ३० सप्टेंबर २०२२ : 'या' राशीच्या लोकांना भाग्याची मिळणार साथ, धनलाभाचेही योग

मेष- काहींना अचानक धनलाभ होईल. खाण्या-पिण्यात वैविध्य राहील. मात्र, जरा बेतानेच मेजवानीवर ताव मारा. दगदग होईल अशी कामे करू नका. थोडा आराम करण्याची गरज आहे. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. प्रवास शक्यतो टाळलेले बरे.

वृषभ- नवीन संधी नवीन ओळखी होतील. त्यातून तुमचा फायदा होईल. महत्त्वाच्या कामातील अडचणी दूर होतील. मनात आनंदी विचार राहतील. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. मुलांची प्रगती होईल.

मिथुन- नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. तुमच्या कर्तृत्वाला वाव मिळेल. आपल्या बरोबर राहून पाठ वळताच कारवाया करणाच्या लोकापासून सावध राहा. घरात आनंदी वातावरण राहील. आरोग्याची काळजी घ्या. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील.

कर्क- व्यवसायात विक्री चांगली होईल. लोकांच्या भेटीगाठी होतील. भावंडांशी मधुर संबंध राहतील. मोठी गुंतवणूक फायदेशीर ठरेल. काहींना प्रवास घडून येतील. मुलांच्या प्रगतीच्या बातम्या कळतील. मानसन्मान, प्रसिद्धी मिळेल. तुमची प्रशंसा होईल.

सिंह- कामानिमित फिरणे होईल. काहींच्या कामात बदल होतील. काहींची बदली होऊ शकते. तुमच्या आवडीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करता येईल. घरी पाहुणे येतील. सतत व्यस्त राहाल. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे.

कन्या- व्यवसायात सतत व्यस्त राहावे लागेल. व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास होतील. प्रवास कार्य साधक ठरतील बाजारपेठेचा अभ्यास करून निर्णय घ्या. जीवनसाथीची चांगली साथ राहील. तरुण वर्गाला आनंदाची बातमी कळेल. भावंडांशी सख्य राहील.

तूळ - एखाद्या उलाढालीत मोठा फायदा होईल. मात्र, आलेला पैसा खर्च करण्याकडे कल राहील. मौजमजा करण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च कराल. महत्त्वाच्या कामात मनासारखे यश मिळेल. खाण्या पिण्याची चंगळ राहील. मात्र, पोट बिघडणार नाही याची काळजी घ्या.

वृश्चिक - महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. अडचणी आपोआप दूर होतील. लोक तुम्हाला सहकार्य करण्यासाठी पुढे येतील जीवनसाथी साथ देईल. तरुण वर्गाला प्रेमात यश मिळेल. नवीन ओळख झालेल्या लोकांपासून सावध राहा. आर्थिक आवक चांगली राहील.

धनू - नोकरीत तुमचे पारडे जड राहील. अधिकारांचा योग्य वापर कराल. घरात सुखशांती राहील. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. थोडा सयम ठेवलेला बरा. प्रवासाचे योग येतील. नीट नियोजन करून प्रवास करा. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

मकर- अनुकूल ग्रहमान आहे. आपण हाती घेतलेल्या प्रत्येक कामात सहजासहजी सफलता मिळेल. विविध प्रकारचे लाभ होतील. धनप्राप्तीचे योग आहेत. नवीन ओळखी होतील. त्यातून तुमचा फायदा होईल. मित्रांची साथ राहील. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल.

कुंभ - अनुकूल बदल होतील. तुमच्या फायद्याची घटना घडेल. कामानिमित्त धावपळ करावी लागेल. घर आणि नोकरी या दोन्ही आघाड्यांवर झटावे लागेल. घरी पाहुणे येतील. नियोजन केले नाही तर व्यवसायात दगदग होईल.

मीन- भाग्याची चांगली साथ राहील. अडचणी दूर होतील. प्रवासाचे योग येतील. प्रवास आनंददायक, कार्य साधक ठरेल. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. जीवनसाथीची खंबीर साथ राहील. कामात सहजासहजी यश मिळेल.

Web Title: Todays Horoscope 30th September 2022 The people of this zodiac sign will get the support of luck and gain money profitable day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app