Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - २७ फेब्रुवारी २०२३, सरकारी कामातून फायदा अन् धनलाभाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 07:18 IST2023-02-27T07:17:08+5:302023-02-27T07:18:56+5:30
Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - २७ फेब्रुवारी २०२३, सरकारी कामातून फायदा अन् धनलाभाची शक्यता
मेष - आज चंद्र मेष राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजच्या दिवसाचा प्रारंभ स्फूर्ती व उत्साहाने होईल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. दुपार नंतर मात्र आरोग्याच्या तक्रारी उदभवू शकतात. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. मित्र व आप्तेष्टांची भेट होईल. आणखी वाचा
वृषभ - द्विधा मनःस्थितीमुळे आपण असमाधानी राहाल. सर्दी, कफ, खोकला, ताप ह्यांचा उपद्रव संभवतो. धार्मिक कार्यसाठी खर्च होईल. स्वकीयांशी दुरावा संभवतो. दुपार नंतर परिस्थिती अनुकूल होईल. कामाचा उत्साह येईल. आणखी वाचा
मिथुन - आज मित्रांकडून आपणास लाभ होईल. भविष्यात फायदा होऊ शकेल अशा नवीन लोकांच्या ओळखी होतील. धनलाभ होईल. प्रवाचे व सहलीचे नियोजन करू शकाल. सरकारी कामातून फायदा होईल. दुपार नंतर थोडे सावध राहावयास लागेल. आणखी वाचा
कर्क - आज कौटुंबिक व व्यावसायिक जीवन आनंदी राहील. ह्या दोन्ही ठिकाणी महत्वाच्या चर्चेत आपण सहभागी व्हाल. कामाचा व्याप वाढल्याने प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होईल. दुपार नंतर प्रकृतीत सुधारणा होऊ लागेल. मित्र भेटीने आपण आनंदित व्हाल. आणखी वाचा
सिंह - दिवसाची सुरुवात शारीरिक व मानसिक अस्वस्थतेने होईल. अती संतापाने इतरांची मने दुखवाल. दुपार नंतर प्रकृतीत सुधारणा होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आणखी वाचा
कन्या - इतरांशी वाद होऊ नयेत म्हणून आपली वाणी संयमित ठेवावी. प्रकृती नरम गरमच राहील. दुपार नंतर एखाद्या प्रवासाचे नियोजन करू शकाल. एखाद्या मंगल कार्यात सहभागी होऊ शकाल. आणखी वाचा
तूळ - आज ज्या ज्या क्षेत्रात आपण वावराल त्या त्या क्षेत्रात आपली प्रशंसा केली जाईल. प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आपण आनंदित व्हाल. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. दुपार नंतर कटुता निर्माण होण्याची शक्यता असल्याने आपल्या वक्तव्यावर संयम ठेवावा लागेल. आणखी वाचा
वृश्चिक - आजचा दिवस आनंद साजरा करण्याचा आहे. व्यापार - व्यवसायात आपण व्यस्त राहाल व त्यातून लाभ सुद्धा होतील. अनेक लोकांच्या सहवासाने विचारांची देवाण - घेवाण होईल. कौटुंबिक व वैवाहिक जीवन समाधानाचे राहील. आणखी वाचा
धनु - आजच्या दिवसाची सुरवात शारीरिक व मानसिक थकव्याने होईल. कष्टाच्या प्रमाणात अपेक्षित यश प्राप्ती होणार नाही. दुपार नंतर मात्र शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. आप्तेष्टांसह दिवस आनंदात घालवू शकाल. आणखी वाचा
मकर -आज आपण अती भावनाशील व्हाल. संपत्ती संबंधी दस्तावेजात काही अडचणी निर्माण होऊ शकतात. मानसिक त्रास संभवतो. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. शासकीय विषयात यशस्वी होऊ शकाल. आणखी वाचा
कुंभ - आज आपले विचार स्थिर राहणार नसल्याने कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका. लेखन कार्य करू शकाल. इतरांच्या वागण्या बोलण्याने आपले मन दुखावले जाऊ शकते. आणखी वाचा
मीन - आज आपणास आपल्या स्वार्थाचा त्याग करावा लागेल. कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील. वाद व मनःस्ताप टाळण्यासाठी आपली वाणी संयमित ठेवावी लागेल. कामासाठी एखादा प्रवास संभवतो. आणखी वाचा