आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२२: 'या' राशीच्या लोकांना आज रागावर ताबा ठेवावा लागेल, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 07:52 IST2022-12-24T07:52:34+5:302022-12-24T07:52:59+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope, 24th December 2022: People of 'Ya' must control their anger today, otherwise... | आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२२: 'या' राशीच्या लोकांना आज रागावर ताबा ठेवावा लागेल, अन्यथा...

आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२२: 'या' राशीच्या लोकांना आज रागावर ताबा ठेवावा लागेल, अन्यथा...

मेष: चंद्र धनु राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आपणास रागावर ताबा ठेवावा लागेल. अन्यथा आपल्या कामात बिघाड व संबंधात कटुता निर्माण होईल. मानसिक व्यग्रता व मनाची बेचैनी ह्यामुळे आपले कामात लक्ष लागणार नाही. आणखी वाचा 

वृषभ: शारीरिक दृष्टया अस्वस्थ असल्याने कामात सफलता मिळण्यास उशीर होईल व त्यामुळे निराश व्हाल. आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका. योग्य आहार घ्या. आज कामाचा व्याप वाढेल. शिथिलता राहील. प्रवासात विघ्ने येतील. आणखी वाचा 

मिथुन: आज शारीरिक व मानसिक उत्साहामुळे प्रसन्नता लाभेल. मित्र व कुटुंबीयांसह प्रवास किंवा मेजवानीचा बेत ठरवाल. मनोरंजनाची सर्व साधने आज उपलब्ध होतील. भारी वस्त्रे, स्वादिष्ट भोजन व वाहन सुख मिळेल. आणखी वाचा 

कर्क: आजचा दिवस यशदायी व आनंददायी आहे. कुटुंबियांसह घरात सुखा - समाधानात दिवस घालवाल. नोकरदारांना लाभ होतील. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. कार्यात यश मिळेल. स्त्रीयांच्या सहवासात आनंदित व्हाल. आपल्या आधीन असणार्‍या व्यक्ती व सहकारी ह्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. आणखी वाचा 

सिंह:  आज आपणास लेखन व साहित्य क्षेत्रात काही नवनिर्मिती करण्याची प्रेरणा मिळेल. विद्यार्थी अभ्यासात चमकतील. प्रणयातील यश व प्रिय व्यक्तीशी झालेला सुसंवाद आपले मन आनंदित करेल. स्त्री वर्गाकडून अधिक सहकार्य मिळेल. आणखी वाचा 

कन्या:  आज प्रत्येक कार्यात प्रतिकूलतेचा अनुभव येईल. आरोग्य बिघडेल. मन चिंताग्रस्त राहील. कुटुंबियांशी पटणार नाही व त्यामुळे घरात शांतता नांदणार नाही. सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता आहे. पाण्या पासून भीती आहे. सबब जलाशयाच्या ठिकाणी दुस्साहस करू नका. आणखी वाचा 

तूळ:  आज एखाद्या मांगलिक कार्या निमित्त प्रवासाचा बेत आखाल. भावंडांशी खेळीमेळीच्या वातावरणामुळे घरगुती प्रश्नांवर नीट चर्चा होईल. कामा निमित्त बाहेर जावे लागेल. परदेशातून चांगल्या बातम्या मिळतील. नवीन कार्य सुरू करू शकाल. धनलाभ संभवतो. आजचा दिवस आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल आहे. आणखी वाचा 

वृश्चिक: आज कौटुंबिक कलह होण्याची शक्यता आहे. कुटुंबियांशी गैरसमज होणाची शक्यता आहे. मनात येणारे नकारात्मक विचार दूर सारावे लागतील. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडचणी येतील. अनावश्यक खर्च उदभवू नयेत ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. आणखी वाचा 

धनु: आजचा दिवस प्रवासाचा आहे. ठरविलेली कामे पूर्ण होतील. शरीर व मन स्वस्थ राहिल्यामुळे आपण उत्साही व आनंदी राहाल. कुटुंबात मंगल कार्ये ठरतील. स्वकीयांशी संवाद साधल्याने मन प्रसन्न राहील. आणखी वाचा 

मकर: आज एखाद्या गूढ विषयाची गोडी लागेल. आपण त्याच्यातच मग्न व्हाल. तसेच त्यासाठी खर्च देखील कराल. कोर्ट - कचेरी संबंधी कामे निघतील. व्यावसायिक कामात विघ्न येईल. मित्रांच्या प्रतिष्ठेची हानी होईल. उत्साह व प्रसन्नता नाहीशी होईल. एखादा अपघात किंवा शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा 

कुंभ:  आजचा दिवस लाभदायी आहे. व्यवसायात लाभ होईल. मित्र भेटतील व त्यामुळे आपणास आनंद होईल. त्यांच्यासह प्रवास सुद्धा करण्याचे ठरवाल. नवीन कामाची सुरूवात फायदेशीर ठरेल. आणखी वाचा 

मीन: आजचा दिवस व्यापार - व्यवसायात लाभ मिळवून देणारा आहे. नोकरीत आपल्या यशामुळे वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. पदोन्नती संभवते. व्यापार्‍यांना व्यापारात लाभ व वृद्धी होईल. पित्याकडून लाभ होतील. आणखी वाचा 

Web Title: Today's Horoscope, 24th December 2022: People of 'Ya' must control their anger today, otherwise...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app