Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य ०४ ऑक्टोबर २०२२ : मीन राशीच्या लोकांना आजचा दिवस फलदायी, आर्थिक लाभाचे योग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 07:33 IST2022-10-04T07:33:25+5:302022-10-04T07:33:46+5:30

Today's Daily Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस. काय सांगते तुमची राशी.

Today's Daily Horoscope Todays Horoscope 04 October 2022 Today is a fruitful day for Pisces people sum of financial gains know whats your rashi says zodiac signs | Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य ०४ ऑक्टोबर २०२२ : मीन राशीच्या लोकांना आजचा दिवस फलदायी, आर्थिक लाभाचे योग 

Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य ०४ ऑक्टोबर २०२२ : मीन राशीच्या लोकांना आजचा दिवस फलदायी, आर्थिक लाभाचे योग 

मेष: आज आपल्यात तरतरीतपणा व उत्साह यांचा अभाव राहील. तसेच रागाचे प्रमाण वाढल्याने काम बिघडण्याची शक्यता आहे. तेव्हा रागावर नियंत्रण ठेवा. कार्यालयात अधिकारी, विरोधक व घरात कुटुंबीय यांच्याशी वादात न पडता शांत राहून दिवस घालवणे अधिक चांगले. आणखी वाचा

वृषभ - आज कार्यपूर्तीस होणारा विलंब व शारीरिक अस्वास्थ्य ह्यामुळे मनात नैराश्याची भावना बळावेल. कामाचा व्याप वाढल्याने मानसिक बेचैनी राहील. प्रवासात विघ्न येण्याची शक्यता आहे. आज नवे काम आज सुरू करू नये.  आणखी वाचा

मिथुन - आजचा दिवस आनंददायी आहे. शरीर व मन आनंदी राहील. कुटुंबीय व मित्र परिवार यांच्यासह एकाद्या पर्यटन स्थळाला भेट द्याल. स्वादिष्ट भोजन मिळेल. नव्या कपड्यांची खरेदी होईल. आणखी वाचा

कर्क - आजचा दिवस खुशीचा व यशाचा आहे. कुटुंबात सुख - शांती व समाधान राहील. नोकरदारांना कार्यालयात अनुकूल वातावरण राहील. नोकर वर्गाकडून व मातुल घराण्याकडून लाभ होईल. आणखी वाचा

सिंह - आज आपण शारीरिक व मानसिक दृष्टया शांतपणे काम कराल. सृजनात्मक कामांची अधिक गोडी लागेल. साहित्य व कला क्षेत्रांत काही नवनिर्मिती करण्याची प्रेरणा मिळेल. आणखी वाचा

कन्या - आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. अनेक गोष्टींची काळजी लागून राहील. त्यामुळे शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. कुटुंबियांशी मतभेद होतील. आणखी वाचा 

तूळ - आज नशिबाची साथ लाभेल. भावंडांशी सौहार्दतेचे संबंध राहतील. एखाद्या प्रवासाचे नियोजन कराल. नवीन कार्यारंभास आजचा दिवस अनुकूल आहे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आणखी वाचा

वृश्चिक - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. वाणी संयमित ठेवल्यास कुटुंबात सुख - शांति नांदू शकेल. विचारांवर असलेला नकारात्मक पगडा दूर सारावा लागेल. आणखी वाचा

धनु - आज शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. नियोजित कामे करु शकाल. आर्थिक फायदा होईल. प्रवास संभवतात. नातेवाइकां कडील एखाद्या मंगल कार्यात सहभागी व्हाल. स्वकीयांना भेटून आनंद होईल.  आणखी वाचा

मकर - आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. कामांमध्ये सहकार्यांचा हस्तक्षेप वाढेल. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात व्यस्तता वाढेल व त्यात खर्चही होऊ शकतो. आरोग्य विषयक चिंता राहील. आणखी वाचा

कुंभ - नवीन कार्य सुरु करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. नोकरी - व्यवसायात फायदा संभवतो. एखाद्या स्त्रीमुळे आपली कामे होतील. आज मोठे आर्थिक लाभ होतील. सामाजिक क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. संततीशी सलोख्याचे संबंध राहतील. आणखी वाचा

मीन - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कामे यशस्वीपणे होऊ शकतील. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश झाल्याने आपला दिवस आनंदात जाईल. व्यापार वृद्धी होईल. वडील व वडिलधाऱयां कडून फायदा होईल. एखादा मोठा आर्थिक लाभ संभवतो. आणखी वाचा

Web Title: Today's Daily Horoscope Todays Horoscope 04 October 2022 Today is a fruitful day for Pisces people sum of financial gains know whats your rashi says zodiac signs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app