Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २५ जुलै २०२२: ‘या’ ७ राशींना अनुकूल दिवस; लाभ, मान-सन्मान मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 07:47 IST2022-07-25T07:43:50+5:302022-07-25T07:47:28+5:30

Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

todays daily horoscope july 25 2022 know what your rashi says rashi bhavishya | Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २५ जुलै २०२२: ‘या’ ७ राशींना अनुकूल दिवस; लाभ, मान-सन्मान मिळेल

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २५ जुलै २०२२: ‘या’ ७ राशींना अनुकूल दिवस; लाभ, मान-सन्मान मिळेल

मेष:  चंद्र वृषभ राशीस स्थित आहे. स्वतःबद्धलचे विचार बाजूला ठेवून इतरांचा विचार करावा लागेल. कुटुंबीयांसाठी काही विशेष काम व व्यवहार करावे लागतील. इतरांशी वाद व मतभेद टाळण्यासाठी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. भोजन नेहेमीच्या वेळेस घेता येणार नाही. अतिरिक्त खर्च टाळण्यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. अधिक वाचा

वृषभ: आर्थिक व्यवहारांचे यशस्वीपणे नियोजन कराल. आर्थिक लाभ संभवतो. उत्साही मन व स्थिर विचारांमुळे सर्व कामे आपण व्यवस्थित पूर्ण करू शकाल. आज मनोरंजन, सौंदर्य प्रसाधने, अलंकार ह्यासाठी पैसा खर्च होईल. कुटुंबीयांसह आनंदात वेळ घालवू शकाल. अधिक वाचा

मिथुन: आजचा दिवस कष्टदायी असल्याने प्रत्येक काम सावधपणे करावे लागेल. कुटुंबीय व संततीशी मतभेद संभवतात. आवेश व संतापावर नियंत्रण ठेवल्यास कामे बिघडणार नाहीत. शरीर प्रकृती बिघडेल. डोळ्यांचा त्रास जाणवेल. एखादा अपघात संभवतो. अचानकपणे खर्चात वाढ होईल.  अधिक वाचा

कर्क: आजचा दिवस उत्साहात व आनंदात जाईल. व्यापारात लाभ होईल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. मित्रांशी चर्चा झाल्याचा आनंद होईल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. रमणीय स्थळी सहलीचे बेत आखाल. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. अधिक वाचा

सिंह: आज आपल्या कार्यक्षेत्रात आपले वर्चस्व राहील. वरिष्ठ आपल्या कामगिरीने प्रभावित होऊन आपणावर खूष होतील. दृढ मनोबल व खंबीर आत्मविश्वासामुळे आपले प्रत्येक काम यशस्वी होईल. वडिलांशी सौहार्दाचे संबंध राहतील व त्यांच्या कडून लाभ सुद्धा होईल.  अधिक वाचा

कन्या: आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मनात चिंता राहील. शारीरिक स्फूर्तीचा अभाव जाणवेल. थकवा व अशक्तपणामुळे कामे धीम्या गतीने होतील. नोकरी - व्यवसायात सहकारी व अधिकारी नाराज होतील. संतती विषयक चिंता राहील. त्यांच्याशी मतभेद होतील.  अधिक वाचा

तूळ: आज शक्यतो वाद टाळणे हितावह राहील. रागावू नका. उक्ती व कृतीवर नियंत्रण ठेवणे हितावह ठरेल. हितशत्रूं पासून सावध राहावे. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. अचानक धनलाभ संभवतो. एखाद्या गूढ विषयाकडे आपण आकर्षित व्हाल. मानसिक शांतीसाठी प्रयत्न करावे लागतील. अधिक वाचा

वृश्चिक: आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस मनोरंजनाचा आहे. मित्रांसह मौजमजा, मेजवानी इत्यादीत आजचा दिवस घालवाल. उत्तम वस्त्रालंकार, वाहन व भोजनसौख्य लाभेल. मान - प्रतिष्ठेत वाढ होईल. अधिक वाचा

धनु: आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. घरात आनंददायी वातावरण राहील. शारीरिक स्वास्थ्य व मानसिक प्रसन्नता लाभेल. नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. सहकार्यांचे उत्तम सहकार्य मिळेल. स्त्रीयांना माहेरहून चांगली बातमी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. अधिक वाचा

मकर: शारीरिकदृष्टया आळस, थकवा व अशक्तपणा जाणवेल. मानसिक चिंता राहील. नशिबाची साथ मिळणार नाही. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर नाराज होतील. द्विधा मनःस्थितीमुळे निर्णय घेण्यात अडचणी येतील. संततीच्या आरोग्य विषयक तक्रारी राहतील. अधिक वाचा

कुंभ: आज आपणास स्वभावातील हट्टीपणा सोडावा लागेल. अती भावनाशीलतेमुळे मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रतिष्ठेस तडा जाण्याची शक्यता आहे. घर व संपत्ती संबंधित कामे सावधपणे करावीत. आईकडून लाभ होईल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस अनुकूल आहे. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. अधिक वाचा

मीन: आजचा दिवस महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अनुकूल आहे. आपली सृजनशक्ती वाढेल. स्थिर विचार व खंबीर मन ह्यामुळे कार्य चांगल्या प्रकारे करू शकाल. मित्रांसह प्रवास - पर्यटन होऊ शकेल. भावंडांशी जवळीक वाढेल. सामाजिक मान - सन्मान व प्रतिष्ठा वाढेल. अधिक वाचा

Web Title: todays daily horoscope july 25 2022 know what your rashi says rashi bhavishya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app