Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य ३० ऑक्टोबर २०२२ : वरिष्ठांची मर्जी राहिल, व्यापारातील येणी वसूल होतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2022 07:17 IST2022-10-30T07:17:13+5:302022-10-30T07:17:43+5:30

Today's Daily Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस. काय सांगते तुमची राशी.

Today's Daily Horoscope 30 October 2022 Seniors will be favoured business income will be recovered know what your zodiac sign says | Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य ३० ऑक्टोबर २०२२ : वरिष्ठांची मर्जी राहिल, व्यापारातील येणी वसूल होतील

Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य ३० ऑक्टोबर २०२२ : वरिष्ठांची मर्जी राहिल, व्यापारातील येणी वसूल होतील

मेष: आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. सरकार विरोधी कृत्यां पासून शक्यतो दूर राहा. एखादा अपघात संभवतो. बाहेरचे खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे स्वास्थ्य बिघडेल. कामे वेळेवर पूर्ण होणार नाहीत. व्यवसायात त्रास संभवतो. नोकरीत वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. आणखीवाचा

वृषभ - मित्र व स्वकीयांसह हिंडण्या - फिरण्यामुळे आनंद मिळेल. सुंदर वस्त्राभूषणे व स्वादिष्ठ भोजनाची संधी मिळेल. दुपार नंतर मात्र प्रकृतीस काही त्रास संभवतो. आणखीवाचा

मिथुन - आजचा दिवस भरपूर मनोरंजन करून आनंदात घालविण्याचा आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. कार्यालयीन वातावरण आपणास अनुकूल असेल. मित्रांसह सहलीला जाऊ शकाल. आणखीवाचा

कर्कआजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. पोटाच्या तक्रारी निर्माण होतील. परंतु दुपार नंतर परिस्थिती अनुकूल होईल. प्रकृती सुधारेल. मानसिक स्वास्थ्यही ठीक राहील. नोकरीतील वातावरण अनुकूल राहील. अपुरी कामे पूर्णत्वास जातील. आणखीवाचा

सिंह - आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मानसिक स्थिती तणावपूर्ण राहील व शारीरिकदृष्टया अस्वस्थता जाणवेल. कुटुंबियांशी एखादा वाद होण्याची शक्यता असल्यामुळे आपणास संयमित राहावे लागेल. धन व कीर्ती यांची हानी संभवते. संतती संबंधी एखादी काळजी निर्माण होईल. बौद्धिक वाद संभवतात. आणखीवाचा

कन्या -  आज आपण गूढ विद्येकडे आकर्षित व्हाल. आर्थिक लाभ संभवतात. आजचा दिवस नवीन कार्याचा आरंभ करायला अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. विरोधकांवर मात करू शकाल. दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. मानसिक व शारीरिक दृष्टया अस्वस्थता जाणवेल. आणखीवाचा

तूळ - आज सकाळच्या प्रहरी प्रकृतीत बिघाड होण्याची शक्यता आहे. मानसिक थकवा जाणवेल. कुटुंबियांशी प्रेमाने वागावे लागेल. आज एखाद्या धार्मिक कार्यावर खर्च होण्याची शक्यता आहे. दुपार नंतर प्रसन्नतेचा अनुभव घ्याल. आर्थिक लाभ होईल. आणखीवाचा

वृश्चिक - आज शारीरिक तथा मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. घरात आनंद व उत्साहाचे वातावरण राहील. संताप होऊ देऊ नका. स्नेहीजनांच्या सहवासाचा आनंद घ्या. दुपार नंतर नकारात्मक विचार आपणाला त्रास देतील. आपल्या बोलण्याने किंवा कृतीने कुटुंबीय दुखावतील व त्यामुळे कटुता निर्माण होईल. आणखीवाचा

धनु - कुटुंबियांशी कटुता निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे आज आपली वाणी व संताप ह्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य राहील. आज शक्यतो शस्त्रक्रिये सारख्या बाबी टाळणे हितावह राहील. दुपार नंतर कामे यशस्वी होतील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आणखीवाचा

मकर - आजचा दिवस व्यापार - व्यवसायासाठी लाभदायी आहे. पत्नी व संतती ह्यांच्याकडून काही फायदा संभवतो. कौटुंबिक जीवनात घडणाऱ्या काही सुखद प्रसंगामुळे आपण आनंदित व्हाल. दुपार नंतर मानसिक व शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. इतरांशी बोलताना गैरसमज होण्याची शक्यता आहे. आणखीवाचा

कुंभ - आजचा दिवस लाभदायी आहे. व्यापार - व्यवसायातील प्राप्तीत वाढ होईल. सामाजिक मान - सन्मान होतील. नोकरीत वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. पदोन्नती संभवते. स्वास्थ्य ठीक राहील. व्यापारातील येणे वसूल होईल. मित्र भेटतील. आणखीवाचा

मीनबौद्धिक विषयात व त्या संबंधी लेखनात आज आपण मग्न रहाल. नवीन कार्याची सुरुवात करू शकता. दूरचे प्रवास संभवतात. परदेशातील मित्र किंवा स्वकियांशी संपर्क साधू शकाल. आज आपणास उत्साह व थकवा दोन्हीही जाणवतील. आणखीवाचा

Web Title: Today's Daily Horoscope 30 October 2022 Seniors will be favoured business income will be recovered know what your zodiac sign says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app