Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य ०५ ऑक्टोबर २०२२ : 'या' राशीच्या लोकांनी रागावर, वाणीवर नियंत्रण ठेवा; आर्थिक लाभाचेही योग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 07:33 IST2022-10-05T07:32:31+5:302022-10-05T07:33:05+5:30

Today's Daily Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस. काय सांगते तुमची राशी.

Today's Daily Horoscope 05 October 2022 People of this zodiac keep control over anger speech Addition of financial benefits | Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य ०५ ऑक्टोबर २०२२ : 'या' राशीच्या लोकांनी रागावर, वाणीवर नियंत्रण ठेवा; आर्थिक लाभाचेही योग

Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य ०५ ऑक्टोबर २०२२ : 'या' राशीच्या लोकांनी रागावर, वाणीवर नियंत्रण ठेवा; आर्थिक लाभाचेही योग

मेष: आज आपण एखाद्या अडचणीत सापडू शकता. नोकरीत इतरांशी प्रेमाने वागून कार्य पूर्ण करून घ्या. वाद संभवतात. नशिबाची साथ मिळणार नाही. कामात त्वरित यश मिळणार नाही. दुपार नंतर परिस्थितीत सुधारणा होईल. आणखीवाचा

वृषभ - आज आपण हळवे व्हाल व त्यामुळे आपणास बेचैनी जाणवेल. शारीरिक स्वास्थ्यावर सुद्धा त्याचा नकारात्मक परिणाम होईल. नवे कार्य आज सुरू करू नका. उक्ती व कृतीवर नियंत्रण ठेवा. खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या. व्यवसायात विघ्ने येतील. नोकरीत वरिष्ठांशी संघर्ष होण्याची शक्यता आहे.  आणखीवाचा

मिथुन - आजचा दिवस आनंददायी आहे. आज आपली मनःस्थिती मनोरंजनात्मक कार्यात सहभागी होण्याची असल्याने मित्रांसह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. रुचकर भोजन व उंची वस्त्रालंकार लाभतील. दुपार नंतर आपण जास्त हळवे व्हाल व त्यामुळे मनातील दुःख वाढेल. आर्थिक खर्चात वाढ होईल.  आणखीवाचा

कर्कआज व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील. स्त्रियांना माहेरहून आनंददायी बातमी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. आणखीवाचा

सिंह - आजचा दिवस प्रणयाराधनेसाठी अनुकूल आहे. रागावर नियंत्रण ठेवा. पोटाच्या व्याधी त्रास देतील. दुपार नंतर घरात आनंद- उत्साहाचे वातावरण राहील. मानसिक प्रसन्नता व उत्साह जाणवेल. आणखी वाचा

कन्या -  आज शारीरिक स्वास्थ्य, मानसिक तरतरी व चेतना शक्तीचा अभाव राहील. सामाजिक स्तरावर मानहानी संभवते. धनहानी सुद्धा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. आणखी वाचा

तूळ - आजचा दिवस नवे कार्य हाती घेण्यास अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीच्या भेटीने आनंद होईल. भाग्योदय होईल. समाजात मान- सन्मान मिळतील. दुपार नंतर मात्र मन उदास होईल. शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. घरातील वातावरण क्लेशकारक राहील. आणखीवाचा

वृश्चिक - नियोजित काम पूर्ण न झाल्याने नैराश्य येईल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे आज टाळावे. घरगुती वातावरण क्लेशदायी राहील. दुपार नंतर भावंडांसह आनंदात वेळ घालवाल. प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल.  आणखीवाचा

धनु - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नियोजित कामे पूर्ण होऊन धनप्राप्ती होईल. शारीरिक व मानसिक दृष्टया उत्साहित व ताजेतवाने राहाल. प्रत्येक काम उत्साहाने कराल. प्रवास संभवतो. दुपार नंतर मात्र द्विधा मनःस्थिती होईल.  आणखीवाचा

मकर - आज आपल्या बोलण्या वागण्याने भांडण होण्याची शक्यता असल्याने त्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. संतापाचे प्रमाण वाढेल. मन चिंतीत राहील. मनःशांती मिळविण्याचा प्रयत्न करा. दुपार नंतर स्फूर्ती व उत्साह वाढेल. आणखीवाचा

कुंभ - आजचा दिवस सर्व दृष्टींनी लाभदायी आहे. सामाजिक क्षेत्रात आपण सक्रीय राहाल व त्याच्या फल स्वरूप आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकल्याने त्यांच्या आनंदात भर पडेल. दुपार नंतर मात्र घरातील वातावरण कलुषित होईल. आणखीवाचा

मीनआजचा दिवस आपणास सर्व दृष्टींनी लाभदायी आहे. हातून परोपकारी कार्य घडेल. व्यापारात सुयोग्य नियोजनामुळे व्यापार वृद्धी करू शकाल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामाचे कौतुक करतील. व्यापारासाठी प्रवास करावा लागेल. आणखीवाचा

Open in app

Web Title: Today's Daily Horoscope 05 October 2022 People of this zodiac keep control over anger speech Addition of financial benefits