Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य ०३ ऑक्टोबर २०२२ : या राशीच्या लोकांना लाभदायक दिवस, व्यवसायातही फायदा होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 07:36 IST2022-10-03T07:35:14+5:302022-10-03T07:36:14+5:30
Today's Daily Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस. काय सांगते तुमची राशी.

Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य ०३ ऑक्टोबर २०२२ : या राशीच्या लोकांना लाभदायक दिवस, व्यवसायातही फायदा होणार
मेष: आज आपणास आपला संताप नियंत्रित ठेवावा लागेल. कोणत्याही कामात व्यत्यय येण्यास हा संताप कारणीभूत ठरेल. शरीरात उत्साहाची उणीव भासेल. मनाची अस्वस्थता कोणतेही काम करण्याची प्रेरणा देणार नाही. आणखी वाचा
वृषभ - आज हाती घेतलेले काम पूर्ण न झाल्याने आपण निराश व्हाल. कार्यात यश मिळण्यासाठी जरा विलंब लागेल. खाण्या - पिण्यामुळे प्रकृती बिघडेल. नवीन काम सुरू करायला आजचा दिवस अनुकूल नाही. प्रवासात विघ्ने येतील. आणखी वाचा
मिथुन - आज आपण मौज - मजा व मनोरंजन यांत विशेष रस घ्याल. कुटुंबीय, मित्रमंडळी व प्रिय व्यक्तीसह बाहेर फिरायला जाण्याचा बेत कराल. सार्वजनिक जीवनात मान - प्रतिष्ठा वाढेल. भिन्नलिंगी व्यक्तीचे आकर्षण वाटेल. आणखी वाचा
कर्क - आजचा दिवस व्यापार - व्यवसायात फायदा मिळवून देणारा आहे. सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. आज आपल्या सहवासात कुटुंबियांचा वेळ खूप आनंदात जाईल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आणखी वाचा
सिंह - आजचा दिवस नवनिर्माण व कला ह्या साठी उत्तम आहे. विद्यार्थ्यांना सुद्धा अभ्यासात प्रअनुकूलता लाभेल. स्नेही व मित्र यांच्या गाठीभेटी होतील. आणखी वाचा
कन्या - आज आपणास प्रतिकूलतेस तोंड देण्यास तयार राहावे लागेल. आरोग्य विषयक तक्रारी राहतील. मनावर काळजीचे दडपड राहिल्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. कुटुंबियांशी खटका उडेल. आईच्या प्रकृतीची काळजी राहील. आणखी वाचा
तूळ - सांप्रतकाळी धाडस करणे, एखादे काम हाती घेणे यांसाठी दिवस अनुकूल आहे. योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आपणास लाभदायक ठरेल. कुटुंबात भावंडांशी आपलेपणा व खेळीमेळीचे वातावरण असेल. आणखी वाचा
वृश्चिक - आज नकारात्मक मानसिक वृत्ती टाळावी. 'मौनं सर्वार्थ साधनम्' या नीतीने वागा म्हणजे कुटुंबियांशी संघर्ष होणार नाही. आरोग्याच्या तक्रारी राहतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. आणखी वाचा
धनु - आज निर्धारित केलेली सर्व कार्ये पूर्ण होतील. आर्थिक लाभ होतील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य आपणाला आनंदी ठेवेल. एखादा प्रवास संभवतो. आपली माणसे भेटल्याचा आनंद होईल. आणखी वाचा
मकर - आज मन अस्वस्थ राहील. एखाद्या मांगलिक किंवा सामाजिक कार्यासाठी पैसा खर्च होईल. स्वकीय व मित्रांशी मतभेद होतील. धनहानी व मानहानीची शक्यता आहे. आणखी वाचा
कुंभ - आज आपणांस मिळणार्या फायदयामुळे आपला आनंद द्विगुणित होईल. नव्या कार्यासाठी केलेला प्रारंभ कार्यसिद्धीच्या दृष्टीने शुभ आहे. व्यापारी वर्गाला व्यापारात फायदा होईल. आणखी वाचा
मीन - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नोकरी - व्यवसायात यश मिळेल. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश झाल्यामुळे आपल्या मनाची प्रसन्नता वाढेल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. आणखी वाचा