आजचे राशीभविष्य, ४ जानेवारी २०२३: धनु राशीसाठी आर्थिक लाभाचा दिवस, कार्यात अपेक्षित यश मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 07:18 IST2023-01-04T07:18:04+5:302023-01-04T07:18:42+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today s Horoscope January 4 2023 A day of financial gain for Sagittarius expected success in work astrology zodiac signs | आजचे राशीभविष्य, ४ जानेवारी २०२३: धनु राशीसाठी आर्थिक लाभाचा दिवस, कार्यात अपेक्षित यश मिळणार

आजचे राशीभविष्य, ४ जानेवारी २०२३: धनु राशीसाठी आर्थिक लाभाचा दिवस, कार्यात अपेक्षित यश मिळणार

मेष: आज आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. कुटुंबियांसह स्वादिष्ट भोजन घेऊन आनंदात वेळ घालवू शकाल. आर्थिक बाबतीत भविष्यासाठी उत्तम नियोजन करू शकाल. आज प्राप्तीत वाढ होईल. कलावंत, कारागिर ह्यांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल व त्यात त्यांची कदर सुद्धा केली जाईल. आणखी वाचा 

वृषभ: आजचा दिवस उत्साह व प्रसन्नतेचा आहे. प्रकृती उत्तम असल्याने सुख व आनंद अनुभवाल. सगे - सोयरे किंवा मित्र यांच्याकडून उपहार मिळतील. प्रवास व स्वादिष्ट भोजन ह्यामुळे आजचा दिवस आणखीच आनंदी होईल. आणखी वाचा 

मिथुन: आज आपले संयमशील व विचारपूर्ण वर्तन अनेक अनिष्ट गोष्टीं पासून आपला बचाव करू शकेल. आपल्या वक्तव्याने गैरसमज निर्माण होतील. शारीरिक कष्ट मनाला अस्वस्थ बनवतील. कौटुंबिक वातावरण गढूळ राहील. डोळ्यांना पीडा होईल. आणखी वाचा 

कर्क:  आज अचानक धनप्राप्ती तसेच वेगवेगळे फायदे झाल्याने आपण आनंदित व्हाल. प्राप्तीत वाढ होईल. व्यापार्‍यांशी फायद्याचे सौदे होतील. संतती व पत्नी ह्यांच्याकडून लाभ होईल. प्रवास, पर्यटन संभवतात. आणखी वाचा 

सिंह:  आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नातलगांसह प्रवासाचे बेत कराल. स्त्रीवर्गाकडून लाभाची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकाल. परदेशस्थ आप्तेष्टांकडून आनंददायी बातमी मिळेल. आणखी वाचा 

कन्या: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नातलगांसह प्रवासाचे बेत कराल. स्त्रीवर्गाकडून लाभाची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकाल. परदेशस्थ आप्तेष्टांकडून आनंददायी बातमी मिळेल. भावंडांकडून काही लाभ संभवतो. आणखी वाचा 

तूळ: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नातलगांसह प्रवासाचे बेत कराल. स्त्रीवर्गाकडून लाभाची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकाल. परदेशस्थ आप्तेष्टांकडून आनंददायी बातमी मिळेल. भावंडांकडून काही लाभ संभवतो. आणखी वाचा 

वृश्चिक: आजचा दिवस काहीसा वेगळाच आहे. स्वतःसाठी वेळ काढू शकाल. मित्रांसह प्रवास, मौज - मजा, मनोरंजन व एखाद्या सहलीस जाऊन तसेच रुचकर भोजन, वस्त्रालंकार इत्यादींमुळे आज आपण खूप आनंदी राहाल. मान - सन्मानात वाढ होऊन एखादा सत्कार होण्याची शक्यता सुद्धा आहे. वाहनसौख्य मिळेल. आणखी वाचा 

धनु: आजचा दिवस आर्थिक लाभाचा आहे. घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील. नोकरीत लाभ व सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. कार्यात यश मिळेल. प्रकृती उत्तम राहील. मातुल घराण्याकडून एखादी चांगली बातमी मिळेल. आणखी वाचा 

मकर: आज आपण मनाने खूप अशांत राहाल. आज आपण कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ शकणार नाही व त्यामुळे तणावात राहाल. शक्यतो आज कोणताही महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका. आज आपणास नशिबाची साथ न मिळाल्याने आपणास नैराश्य येईल. संतती विषयी चिंतीत व्हाल. कुटुंबातील थोरांची प्रकृती बिघडू शकते. आणखी वाचा 

कुंभ: आज आपण अती संवेदनशील झाल्याने आपले मन बेचैन व अस्वस्थ होईल. जीद्दी बनाल. सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता आहे. स्थावर - संपत्ती किंवा वाहन ह्यांचे कागदपत्र बनवताना सावध राहावे. आणखी वाचा 

मीन: आजचा दिवस महत्वाचा निर्णय घेण्यास अनुकूल आहे. विचारात दृढता राहील. कामे पूर्ण होतील. सृजनात्मक व कलात्मक शक्ती वाढेल. मित्र व कुटुंबियांसह एखाद्या प्रवासाला जाल. भावंडां कडून फायदा होईल. कामाचे यश आपले मन आनंदी करेल. आणखी वाचा 

Web Title: Today s Horoscope January 4 2023 A day of financial gain for Sagittarius expected success in work astrology zodiac signs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app