आजचे राशीभविष्य, १ जानेवारी २०२३: तूळ राशीच्या लोकांना प्रत्येक कामात यश मिळेल, पाहा कसा असेल नववर्षाचा पहिला दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2023 07:19 IST2023-01-01T07:18:44+5:302023-01-01T07:19:35+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today s Horoscope January 1 2023 Libra people will get success in every work see how the first day of New Year will be astrology zodiac sign | आजचे राशीभविष्य, १ जानेवारी २०२३: तूळ राशीच्या लोकांना प्रत्येक कामात यश मिळेल, पाहा कसा असेल नववर्षाचा पहिला दिवस

आजचे राशीभविष्य, १ जानेवारी २०२३: तूळ राशीच्या लोकांना प्रत्येक कामात यश मिळेल, पाहा कसा असेल नववर्षाचा पहिला दिवस

मेष: आज ''कमी वेळात अधिक लाभ'' अशा एखाद्या योजनेत आपली फसवणूक होण्याची शक्यता असल्याने सावध राहावे लागेल. कोर्ट- कचेरीच्या प्रकरणात अडकू नका. आज कोणाला जामीन राहू नका. आज मनाची एकाग्रता कमी राहील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक देवाण - घेवाणीत लक्ष द्यावे लागेल. एखादी दुर्घटना संभवते. दुपार नंतर मात्र खूप खुशीत राहाल. आणखी वाचा 

वृषभ: आज घर व संतती ह्यांच्याशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळेल. जुन्या परंतु बालपणीच्या मित्रांच्या सहवासाने मनाला आनंद होईल. नवीन मैत्री सुद्धा होईल. व्यावसायिक व आर्थिक लाभ होईल. तरीही दुपार नंतर सांभाळून राहावे लागेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. आणखी वाचा 

मिथुन: आजचा दिवस व्यापारासाठी शुभ फलदायी आहे. व्यापारी लोकांना व्यवसायवृद्धी बरोबरच यश मिळेल व येणी वसूल होतील. वडील आणि वडीलधार्‍यांकडून लाभ होईल. अर्थ प्राप्ती संभवते. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. त्यामुळे काही लाभ संभवतात. मित्रांकडून सुद्धा लाभ होतील. आणखी वाचा 

कर्क:  आजच्या दिवसाचा प्रारंभ मानसिक तणाव व बेचैनीने होईल. शारीरिक दृष्टया आळस व मरगळ जाणवेल. पोटाचा त्रास संभवतो. कोणत्याही कार्यात नशिबाची साथ लाभणार नाही. संतती विषयक चिंता वाढेल. दुपार नंतर मात्र मन प्रसन्न होऊन शारीरिक उत्साह वाढेल. आणखी वाचा 

सिंह:  आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आचार विचारांवर संयम ठेवून अवैध गोष्टींपासून दूर राहणे हितावह राहील. मानसिक व शारीरिक त्रास वाढतील. त्यामुळे प्रकृती बिघडेल. अचानक धनलाभ होईल. संतती विषयक चिंता वाढल्याने निरर्थक खर्च करावा लागेल. आणखी वाचा 

कन्या: आजचा सकाळचा वेळ मित्रांसोबत फिरणे, खाणे - पिणे व मनोरंजन ह्यात आनंदाने घालवाल. भागीदारांशी संबंध चांगले राहतील. दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल. प्रकृतीस त्रास संभवतो. एखाद्या आजारावर अचानकपणे खर्च करावा लागेल. आणखी वाचा 

तूळ:  आज आपण दृढ मनोबल व आत्मविश्वासामुळे प्रत्येक कामात यशस्वी व्हाल. कौटुंबिक जीवनात सुख - शांती लाभेल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. स्वभाव उग्र बनेल. सबब वाणीवर नियंत्रण ठेवा. दुपार नंतर परिस्थितीत बदल होऊन आपण मनोरंजनाचा विचार कराल. आणखी वाचा 

वृश्चिक: आज आपल्यातील मानसिक हळवेपणा वाढेल. मानसिक समतोल साधावा लागेल. अभ्यास व कारकीर्द ह्या संबंधी कामात विद्यार्थ्यांना यश मिळेल. आपली कल्पनाशक्ती व साहित्य निर्मिती ह्यात नावीन्य दिसेल. घरात सुख - शांतीचे वातावरण राहील. आणखी वाचा 

धनु: आज कौटुंबिक शांतता राखण्यासाठी निरर्थक वाद - विवाद टाळणे हितावह होईल. आईची तब्बेत बिघडण्याची शक्यता आहे. धन व प्रतिष्ठेची हानी होण्याचा संभव आहे. दुपार नंतर स्वभावातील हळुवारपणा वाढेल. सृजनशक्तीत सकारात्मकता वाढेल. आणखी वाचा 

मकर: आज महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दृढ व स्थिर विचार ह्यांना अग्रस्थान द्यावे लागेल. मित्र व प्रिय व्यक्तीच्या भेटीमुळे आनंद वाटेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. भावंडांशी जवळीक वाढेल. दुपार नंतर मात्र अप्रिय घटनांमुळे आपले मन अस्वस्थ होईल. शारीरिक दृष्टया स्फूर्ती वाटणार नाही. आणखी वाचा 

कुंभ: आज वाद होऊन कटुता निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे राग व वाणी ह्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. मनात नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. खाण्या - पिण्यात संयम बाळगा. दुपार नंतर वैचारिक स्थैर्य लाभेल. तसेच हाती घेतलेले कार्य तडीस नेऊ शकाल. आणखी वाचा 

मीन: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहिल्याने आपण उत्साहित राहाल. नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबीयांसह वेळ आनंदात घालवाल. धार्मिक कार्यात खर्च होईल. प्रवास संभवतात. दुपार नंतर मात्र मनावर संयम ठेवा, अन्यथा कोणाशी वादविवाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा 

Web Title: Today s Horoscope January 1 2023 Libra people will get success in every work see how the first day of New Year will be astrology zodiac sign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app