आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२२: कुंभ राशीच्या लोकांना आर्थिकदृष्ट्या लाभदायक दिन, आनंदात दिवस जाणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 07:17 IST2022-12-28T07:16:17+5:302022-12-28T07:17:06+5:30
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२२: कुंभ राशीच्या लोकांना आर्थिकदृष्ट्या लाभदायक दिन, आनंदात दिवस जाणार
मेष: आज मित्रांच्या सहवासात आपण आनदात वेळ घालवू शकाल. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. तसेच आपल्याला सुद्धा त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल. नवीन मित्रांमुळे भविष्यात लाभ होतील. आणखी वाचा
वृषभ: नोकरी करणार्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल. वरिष्ठांची आपणावर मर्जी राहील. पदोन्नती पण मिळू शकेल. वैवाहिक जीवनात माधुर्य वाढेल. आणखी वाचा
मिथुन: आज आपणाला प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागेल. आरोग्य बिघडल्याने कोणतेही काम करण्याचा उत्साह असणार नाही. नोकरी - व्यवसायात सहकारी व वरिष्ठांचे सहकार्य न मिळाल्याने मानसिक दृष्टया निराश व्हाल. संतती विषयक समस्या निर्माण होतील. आणखी वाचा
कर्क: आज आपल्यावर नकारात्मक विचारांचा पगडा राहील. संतापाचे प्रमाण वाढेल. आरोग्याच्या तक्रारी राहतील. अवैध काम व चोरी ह्या सारख्या विचारांवर ताबा ठेवा अन्यथा अरिष्ट येईल. वाणीवर पण नियंत्रण ठेवा. कुटुंबियांशी वादविवाद होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
सिंह: आज पति - पत्नीत मतभेद होऊन कटुता निर्माण होईल. दोघां पैकी एकाचे स्वास्थ्य बिघडणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. सांसारिक किंवा इतर प्रश्नांमुळे मन उदास राहील. सामाजिक क्षेत्रात अपयशी व्हाल. आणखी वाचा
कन्या: आज नोकरी - व्यवसायात यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. सहकार्यांचे सहकार्य वाढेल. कुटुंबातील वातावरण सुखावह असेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभ होईल. आणखी वाचा
तूळ: आपली वैचारिक व मधुर वाणी लोकांना प्रभावित करेल व तसेच त्यामुळे इतर व्यक्तींशी संबंध दृढ होतील. चर्चा - वादविवाद ह्यात सुद्धा आपला प्रभाव राहील. कष्टाच्या मानाने यश संतोषजनक नसेल. कामात सांभाळूनच पुढे चला. आणखी वाचा
वृश्चिक: आज मित्रांशी सावधपणे वागावे लागेल. शारीरिक व मानसिक अस्वस्थता राहील. मातेचे स्वास्थ्य बिघडू शकते. धन व किर्तीची हानी होईल. कौटुंबिक वातावरण त्रासदायक राहील. आणखी वाचा
धनु: आजचा दिवस नव कार्यारंभास शुभ फलदायी आहे. भावंडांशी सलोखा वाढेल. तसेच कुटुंबीयांसह प्रवासाचे बेत ठरवाल. आरोग्य उत्तम राहील. नशिबाची साथ लाभेल. गूढ विषयांची गोडी वाटेल. आणखी वाचा
मकर: आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. कुटुंबियांशी गैरसमजातून मतभेदाचे प्रसंग घडल्याने मन दुःखी होईल. विनाकारण खर्च होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आज विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. शेअर्स मध्ये गुंतवणूक करू शकाल. आणखी वाचा
कुंभ: आजचा दिवस आपणास आर्थिक दृष्टया लाभदायी आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. मित्र व कुटुंबीय ह्यांच्यासह आनंदात दिवस घालवाल. प्रवास, सहल ह्यातून सुद्धा आज आनंद मिळवू शकता. आणखी वाचा
मीन: स्थावर संपत्ती व कोर्ट - कचेरी ह्यांच्या पासून आज शक्यतो दूर राहा. मनाच्या एकाग्रतेमुळे सर्व कामात फायदा होईल. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. स्वकीयांचा वियोग घडू शकतो. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. मिळणार्या फायदयात नुकसान होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. आणखी वाचा