आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२२: मकर राशीच्या लोकांनी हाती घेतलेलं काम सहजरित्या पूर्ण होईल, पाहा काय सांगते तुमची राशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 07:31 IST2022-12-26T07:31:09+5:302022-12-26T07:31:18+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today s Horoscope 26 December 2022 The work undertaken by Capricorns will be completed easily see what your horoscope says astrology zodiac sign | आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२२: मकर राशीच्या लोकांनी हाती घेतलेलं काम सहजरित्या पूर्ण होईल, पाहा काय सांगते तुमची राशी

आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२२: मकर राशीच्या लोकांनी हाती घेतलेलं काम सहजरित्या पूर्ण होईल, पाहा काय सांगते तुमची राशी

मेष: चंद्र मकर राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी असेल. आज घर, कुटुंब व संतती यांच्या संबंधी आपणाला आनंद व संतोषाची भावना राहील. आज आप्तेष्ट व मित्र आपणाला घेरून टाकतील. व्यापार - व्यवसायासाठी प्रवास होऊन त्यात लाभ होईल.  आणखी वाचा 

वृषभ: चंद्र मकर राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज परदेशस्थ स्नेहीजनांकडून व मित्रवर्गाकडून आनंददायी बातम्या मिळाल्याने आपण आनंदित व्हाल. परदेशी जाण्यास इच्छुक असणाऱ्यांना चांगली संधी प्राप्त होईल. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. आणखी वाचा 

मिथुन: चंद्र मकर राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज कोणत्याही प्रकारच्या संकटा पासून बचाव होण्यासाठी रागावर नियंत्रण ठवावे लागेल. आजचा दिवस शस्त्रकियेसाठी अनुकूल नाही. खर्च वाढल्याने आर्थिक चणचण भासेल. कुटुंबीय व सहकारी यांच्याशी मतभेद झाल्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. आणखी वाचा 

कर्क: चंद्र मकर राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातव्या स्थानी असेल. आज आपण मौज - मजा व मनोरंजन ह्यात गढून जाल. मित्र व कुटुंबीयांसह करमणूक केन्द्र किंवा पर्यटन स्थळी जाण्याची संधी मिळेल. स्वादिष्ट भोजन लाभेल. नवी वस्त्रे व अलंकार ह्यांची खरेदी होईल. वाहनसुख मिळेल. सार्वजनिक क्षेत्रात मान मिळेल. आणखी वाचा 

सिंह:  आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी असेल. आज उदासीन वृत्ती व संशयाचे काळे ढग आपल्या मनाला वेढून टाकतील. त्यामुळे मनःस्वास्थ्य लाभणार नाही. तरीही घरात शांततेचे वातावरण राहील. आणखी वाचा 

कन्या:  आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस चिंता व उद्विग्नपूर्ण असून या ना त्या कारणाने काळजी वाढवेल. विशेषतः संतती व आरोग्य विषयक जास्त चिंता वाटेल. पोटाच्या तक्रारी राहतील. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनात अडचणी येतील. आणखी वाचा 

तूळ:  आपल्या राशी पासून चंद्र चवथ्या स्थानी असेल. आज आपण खूप भावनाशील व्हाल व त्यामुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. आईशी मतभेद होतील किंवा तिच्या प्रकृतीची काळजी राहील. प्रवासासाठी आजचा दिवस अनुकूल नाही.  आणखी वाचा 

वृश्चिक: आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस कार्यात यश व आर्थिक लाभ मिळवून देणारा आहे. नवीन कार्याचा आरंभ करू शकता. भावंडांशी अधिक सहयोगपूर्ण व प्रेमाचे संबंध राहतील. प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल. आणखी वाचा 

धनु: आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी असेल. आज द्विधा मनःस्थिती व घरातील बिघडलेले वातावरण यामुळे त्रास होईल. नाहक खर्च होईल. कामे पूर्ण व्हायला विलंब लागेल. महत्वाचे निर्णय घेणे हिताचे ठरणार नाही. कुटुंबियांचे गैरसमज होणार नाहीत यासाठी प्रयत्न करावे लागतील. आणखी वाचा 

मकर: आजच्या दिवसाची सुरवात मंगल वातावरणाने होईल. एखादा मांगलिक प्रसंग घडेल. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. आपले प्रत्येक काम सहजगत्या पूर्ण होईल. मित्र व आप्तेष्टांकडून भेटवस्तू मिळतील. शारीरिक व मानसिक दृष्टया प्रसन्न राहाल. नोकरी - व्यवसायात पण अनुकूल वातावरण राहील. आणखी वाचा 

कुंभ: आर्थिक व्यवहार तसेच जमीन - जुमल्यांच्या व्यवहारात आज कोणाला जामीन न राहणे हितावह राहील. मानसिक एकाग्रता राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करावी. आपल्या निर्णयाशी कुटुंबीय सहमत होणार नाहीत.  आणखी वाचा 

मीन: आजचा दिवस लाभदायक आहे. नोकरी - व्यवसायात उत्पन्न वाढेल. वडीलधारी व मित्रांकडून लाभ होईल. नवे मित्र मिळतील. त्यांची मैत्री भविष्यकाळात लाभदायक ठरेल. मंगलकार्यात हजेरी लावाल. मित्रांसह सहलीचे बेत आखाल. आणखी वाचा 

Web Title: Today s Horoscope 26 December 2022 The work undertaken by Capricorns will be completed easily see what your horoscope says astrology zodiac sign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app