Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य ०६ ऑक्टोबर २०२२ : मकर राशीच्या लोकांना उत्तम दिवस, कामगिरीवर वरिष्ठही खुश होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 07:22 IST2022-10-06T07:21:39+5:302022-10-06T07:22:17+5:30
Today's Daily Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस. काय सांगते तुमची राशी.

Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य ०६ ऑक्टोबर २०२२ : मकर राशीच्या लोकांना उत्तम दिवस, कामगिरीवर वरिष्ठही खुश होणार
मेष: आज नोकरीत वरिष्ठां बरोबर महत्वाच्या विषयावर चर्चा होऊन आपण आखलेल्या योजनेला सरकार कडून फायदा होईल. कार्यालयीन कामासाठी प्रवास घडतील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल व त्यात बदल करून वातावरण प्रसन्न बनवाल. आणखीवाचा
वृषभ - आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. व्यापारी आपल्या व्यापारात भांडवल घालून नवीन कामे सुरू करतील व भविष्यातील योजना ठरवतील. परदेशी प्रवास घडतील. आणखीवाचा
मिथुन - आज अनियंत्रित रागाला लगाम घालावा लागेल. बदनामी व नकारात्मक विचारांपासून दूर राहणे हिताचे ठरेल. खर्च अधिक झाल्याने आर्थिक चणचण भासेल. कुटुंबीय व कार्यालयातील सहकारी यांच्याशी मतभेद किंवा वादविवादाचे प्रसंग येतील. त्यामुळे मन सुन्न राहील. आणखीवाचा
कर्क - आजचा दिवस सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रांत आपणाला लाभदायक ठरेल. मौज - मजेची साधने, उत्तम दागीने व वाहन खरेदी होईल. मौज - मस्ती व मनोरंजनात वेळ खर्च होईल. तसेच भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास आपणास सुखद अनुभव देईल. दांपत्य जीवनात उत्कट प्रेमाचा अनुभव येईल. आणखीवाचा
सिंह - आज आपले मन चिंतेने व्यग्र असेल. एक प्रकारची उदासीनता येईल. दैनंदिन व्यवहारात विघ्न येऊ शकतात. सहकार्यांचे सहकार्य आज अजिबात मिळणार नाही. वरिष्ठांशी मतभेद संभवतात. आणखी वाचा
कन्या - आज आपणाला संतती समस्येमुळे चिंता राहील. अपचना सारख्या पोटाच्या तक्रारी राहतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येतील. बौद्धिक चर्चा व वाद - विवादात सहभागी होऊ नका. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. आणखी वाचा
तूळ - आज शारीरिक थकवा व मानसिक दृष्टया आपण व्यस्त राहाल. माते विषयी चिंता राहील. स्थावर संपत्ती विषयीचे व्यवहार सांभाळून करावे लागतील. शक्य असेल तर प्रवास टाळा. आणखीवाचा
वृश्चिक - आजचा दिवस लाभदायी आहे. आर्थिक लाभ होतील. नशिबाची साथ मिळेल. मित्रां बरोबरच्या संबंधात सौहार्दता असेल. नवीन कार्य सुरू करण्यासाठी आज अनुकूलता लाभेल. एखादा प्रवास ठरवाल. आणखीवाचा
धनु - आज आपल्या मनाची अवस्था द्विधा होईल. कौटुंबिक वातावरण क्लेशदायी राहील. ठरलेली कामे पूर्ण न झाल्याने मन हताश होईल. आज एखादा महत्वपूर्ण निर्णय न घेणे उचित ठरेल. आणखीवाचा
मकर - आज सकाळी आपले मन प्रफुल्लित असेल. आज एखादे मंगलकार्य आपण करू शकाल. वातावरण मंगलमय बनेल. मित्र, स्नेही यांच्याकडून आपणास भेटवस्तू मिळतील. व्यापार- व्यवसायात आपले वर्चस्व राहील. आपल्या कामगिरीवर वरिष्ठ खूष होतील. कामे सहजपणे पार पडतील. आणखीवाचा
कुंभ - आज मन व शरीर अस्वस्थ राहील. कुटुंबियाशी मतभेद संभवतात. आर्थिक देवाण - घेवाण किंवा गुंतवणूक करताना सावध राहावे. कोर्टाच्या कामात सुद्धा सावध राहावे लागेल. खर्च वाढेल. आणखीवाचा
मीन - आज आपण कौटुंबिक व सामाजिक सोहळ्यात सहभागी व्हाल. मित्रांचा सहवास घडेल. त्यांच्यासाठी खर्च सुद्धा करावा लागेल. एखाद्या रम्य स्थळी सहलीसाठी जाऊ शकाल. प्रत्येक क्षेत्रात आपणाला फायदा होईल. आणखीवाचा