Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ३१ जुलै २०२२: ‘या’ ७ राशीच्या व्यक्तींना नानाविध लाभ; आनंददायी व अनुकूल दिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 07:12 IST2022-07-31T07:11:08+5:302022-07-31T07:12:01+5:30
Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ३१ जुलै २०२२: ‘या’ ७ राशीच्या व्यक्तींना नानाविध लाभ; आनंददायी व अनुकूल दिवस
मेष: आजचा दिवस सावध राहण्याचा असून प्रत्येक पाऊल जपूनटाकावे लागेल. एखाद्या व्यक्तीशी तीव्र मतभेद संभवतात. शारीरिक व मानसिक दृष्टया त्रस्त व्हाल. निद्रानाश झाल्यामुळे आरोग्यावर ताण येईल. बौद्धिक चर्चेत सहभागी झाल्याने आनंदित व्हाल, मात्र त्यात वाद निर्माण होणार नाहीत ह्याची दक्षता घ्यावी लागेल. अधिक वाचा
वृषभ: आज आपण भावनेच्या बंधनात गुंतण्याची शक्यता आहे. कामे पूर्ण झाल्याने आनंदाचे प्रमाण वाढेल. भावंडांकडून लाभ होईल. शारीरिक व मानसिक दृष्टया ताजेतवाने राहाल. आर्थिक लाभ संभवतात. परंतु दुपार नंतर परिस्थितीत एकदम बदल होईल. खर्च वाढेल व कामात यशप्राप्ती होणे कठीण होऊन बसेल. अधिक वाचा
मिथुन: आज मनातील नकारात्मक विचार काढून टाकावे लागतील.मनात असंतोष वाढेल. कौटुंबिक वातावरण गढूळ होईल. शारीरिक स्वास्थ्य पण मिळणार नाही. वाचन- लेखनात विद्यार्थ्यांचे मन लागणार नाही. दुपार नंतर मात्र मन प्रसन्न राहील. तरीही नवीन कार्याचा आरंभ करण्याचे धाडस करू नका. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. स्वकीयांच्या सहवासामुळे मन आनंदीत होईल. अधिक वाचा
कर्क: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. मित्र व स्नेहीजनांच्या सहवासाने आपण आनंदित व्हाल. दुपार नंतर मात्र कुटुंबियांशी एखादा वाद होण्याची शक्यता आहे. मन दुःखी होईल. आपल्या मनात नकारात्मक विचार येऊन नैराश्य येण्याची शक्यता आहे. अधिक वाचा
सिंह: आपल्या वक्तव्याने गैरसमज होण्याची किंवा एखादी व्यक्ती दुखावली जाण्याची शक्यता असल्याने आपणास संयमित राहावे लागेल. अपेक्षेहून अधिक खर्च होईल. मानसिक चिंता वाढतील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. दुपार नंतर परिस्थितीत सुधारणा होईल. नवीन कार्याची सुरवात करू शकाल. प्रियजनांचा सहवास घडेल. एखादा आर्थिक लाभ संभवतो. अधिक वाचा
कन्या: आज अनेक प्रकारचे लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात फायदा होईल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल. दुपार नंतर मात्र एखाद्या व्यक्तीशी मतभेद होतील. संतापाच्या भरात कोणाशी वाद होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागेल. प्रकृती नरम गरम होईल. अधिक वाचा
तूळ: आजचा दिवस आपणास अनुकूलतेचा आहे. विविध क्षेत्रात लाभ संभवतात. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. पदोन्नती संभवते. आपली मनीषा पूर्ण होऊ शकेल. प्रिय व्यक्ती व मित्र ह्यांच्याशी संपर्क साधू शकाल. एखादा प्रवास घडेल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. विवाहेच्छुकांचे विवाह जुळू शकतील. अधिक वाचा
वृश्चिक: आजचा दिवस आपणास अनुकूलतेचा आहे. विविध क्षेत्रात लाभ संभवतात. परदेश गमनाची संधी प्राप्त होऊ शकेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. पदोन्नती संभवते. मित्र व प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. त्यांच्यासह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. अधिक वाचा
धनु: मनात नैराश्य व मरगळ असल्याने आज आपण नवीन कार्याची सुरवात करू शकणार नाही. कुटुंबियांशी वाद संभवतात. दुपार नंतर मात्र शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. कुटुंबातील वाद निवळू लागतील. मित्रांचा सहवास घडल्याने मनास उभारी येईल. एखादा प्रवास घडेल. अधिक वाचा
मकर: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. सकाळी आप्तेष्टांच्या सहवासाने आपण आनंदित व्हाल. प्रवास संस्मरणीय होऊ शकेल. भागीदारीत फायदा होईल. व्यापारात लाभ होईल. दुपार नंतर मात्र परिस्थिती प्रतिकूल होईल. शारीरिक व मानसिक अस्वस्थता वाढेल. विचार नकारात्मक होतील. कुटुंबात वाद होतील. अधिक वाचा
कुंभ: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यापार - व्यवसायात अनुकूल वातावरण राहून भरपूर लाभ होतील. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी होऊ शकाल. अधिक वाचा
मीन: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. सकाळी प्रकृती नरम गरम राहील. काही कारणाने अचानक खर्च करावे लागतील. दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. कार्यात यशस्वी होता येईल. कीर्ती लाभ होईल. व्यापारात लाभ होतील. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवू शकाल. अधिक वाचा