Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १४ जानेवारी २०२३: ‘या’ ९ राशींना लाभांचा दिवस; यश, कीर्ती व प्रतिष्ठेत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 07:01 IST2023-01-14T06:59:23+5:302023-01-14T07:01:35+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

today daily horoscope 14 january 2023 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १४ जानेवारी २०२३: ‘या’ ९ राशींना लाभांचा दिवस; यश, कीर्ती व प्रतिष्ठेत वाढ

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १४ जानेवारी २०२३: ‘या’ ९ राशींना लाभांचा दिवस; यश, कीर्ती व प्रतिष्ठेत वाढ

मेष: आजचा दिवस दूरगामी आर्थिक योजनेसाठी अनुकूल आहे. तसेच आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया फायदेशीर आहे. शारीरिक व मानसिक उत्साहाचा अनुभव होईल. मित्र - स्वकीयांकडून भेटवस्तू मिळतील. त्यांच्या सहवासात वेळ आनंदात जाईल. सद्भावनेने केलेले परोपकारी काम मनाला आत्मिक आनंद देईल. आणखी वाचा 

वृषभ: आज मधुर व सौम्य वक्तव्याने नवे संबंध प्रस्थापित व्हायला मदत होईल. शुभ कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. वाचन - लेखन ह्या सारख्या साहित्य प्रकारात अभिरुची वाढेल. कष्टाच्या मानाने यश कमी मिळत असले तरी सुद्धा आपली कामातील तत्परता व कुशलता प्रगतीस सहाय्यक होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. आणखी वाचा 

मिथुन: आज आपल्या द्विधा मनःस्थितीमुळे आपण कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ शकणार नाही. वैचारिक वादळामुळे मानसिक अस्वस्थता अनुभवाल. अती हळवेपणा आपली दृढता कमकुवत करेल. कुटुंब किंवा जमीन या संबंधी विषयावर चर्चा किंवा प्रवास टाळणे हितावह राहील. शारीरिक व मानसिक स्वस्थतेचा अभाव राहील. आणखी वाचा 

कर्क: आज शारीरिक व मानसिक उत्साहा बरोबर घरातील वातावरणही आनंदी असेल. मित्र - स्नेहीजन ह्यांचा सहवास घडेल. मित्रांकडून लाभ होईल. मंगल कार्याची सुरूवात करायला आजचा दिवस अनुकूल आहे. कामातील यश व प्रिय व्यक्तीचा सहवास ह्यामुळे आपण आनंदी राहाल. आर्थिक लाभ संभवतो. नशिबाची साथ लाभेल. मान - सन्मान वाढतील. आणखी वाचा 

सिंह: आजचा दिवस कुटुंबियासह सुखात घालवाल. त्यांचे सहकार्य मिळेल. मित्रांकडून विशेष मदत प्राप्त होईल. दूरचे मित्र व स्नेही ह्यांच्याशी साधलेला संपर्क फायदेशीर ठरेल. आपल्या प्रभावी संभाषणाने लोकांचे लक्ष वेधून घ्याल. प्राप्ती पेक्षा खर्च जास्त होईल. उत्कृष्ट भोजन मिळेल. नियोजित कामात यश कमीच मिळेल. आणखी वाचा 

कन्या: आजचा दिवस लाभदायी आहे. वैचारिक समृद्धी वाढेल. वाकचातुर्य व मधुरवाणी ह्यांच्या साह्याने मैत्रीपूर्ण संबंध विकसीत करू शकाल. उत्तम भोजन, भेटवस्तू, वस्त्र इत्यादींची प्राप्ती होईल. शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. आनंदाची प्राप्ती, जीवन साथीचा सहवास व सहल - प्रवास ह्यामुळे आपला दिवस आनंदात जाईल. आणखी वाचा 

तूळ: आज थोडा सुद्धा असंयम व अवैध व्यवहार आपणास अडचणीत आणेल. एखादी दुर्घटना संभवते. बोलण्यातील शिथीलता उग्र तक्रार वाढवण्याची शक्यता आहे. सगे सोयरे यांच्याशी पटणार नाही. मनोरंजन तसेच फिरण्यात पैसे खर्च होतील. शारीरिक व मानसिक व्यग्रता कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आणखी वाचा 

वृश्चिक: आज नोकरी, व्यापार व व्यवसायात लाभप्राप्ती होईल. मित्रांबरोबर गाठीभेटी, प्रवास ठरवाल. विवाहेच्छुक तरूण तरूणींसाठी चांगली संधी आहे. संतती किंवा पत्नीकडून लाभ होईल. वाडवडील किंवा थोरले बंधू त्या लाभात निमित्तमात्र बनतील. स्नेही किंवा मित्र यांच्याकडून भेटवस्तू मिळतील. वरिष्ठांची मर्जी राहील. वैवाहिक जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगू शकाल. आणखी वाचा 

धनु: आज यश, कीर्ती व प्रतिष्ठा ह्यात वाढ होईल. नोकरीत वरिष्ठ खूश असल्यामुळे पदोन्नतीची शक्यता आहे. स्वास्थ्य ठीक राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वडील तसेच सरकारकडून फायदा मिळेल. आर्थिक योजना चांगल्या प्रकारे पूर्ण कराल. व्यापारासाठी प्रवास होऊ शकतो. इतर लोकांना मदत करण्याचा प्रयत्न कराल. आणखी वाचा 

मकर: आजचा दिवस बौद्धिक कार्य किंवा साहित्य लेखन ह्यासाठी अनुकूल आहे. व्यवसायात नवे विचार प्रवाह आणल्याने आपल्या कामाला नवे स्वरूप येईल. व्यवसाय क्षेत्रातील प्रतिकूल वातावरण मनाला अस्वस्थ करेल. शारीरिक थकवा जाणवेल. संततीच्या समस्या आपणास त्रस्त करतील. व्यर्थ खर्च होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद टाळा. आणखी वाचा 

कुंभ: आज निषेधात्मक व नकारात्मक विचारांपासून दूर राहावे. वाद, भांडणे ह्यापासून दूर राहा. राग व बोलण्यावर संयम ठेवा. कौटुंबिक वातावरण कलुशित राहील. आर्थिक चणचण जाणवेल. खूप विचार केल्याने मानसिक थकवा जाणवेल. आपल्या मनावरचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणखी वाचा 

मीन: आज दैनंदिन कामातून मोकळीक मिळून बाहेर हिंडण्या -फिरण्याला जाण्यास व मनोरंजनासाठी वेळ काढाल. कुटुंबीय व मित्रांना पण त्यात समाविष्ट करून घ्याल. त्यांनाही त्याचा आनंद वाटेल. शारीरिक व मानसिक दृष्टया आज दिवसभर प्रफुल्लित राहाल. आपली प्रतिष्ठा वाढेल. आणखी वाचा 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: today daily horoscope 14 january 2023 know what your rashi says rashi bhavishya in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app