आजचे राशीभविष्य, ०३ एप्रिल २०२६: परदेशवारीची संधी, यश-प्रगती; पण अचानक खर्च वाढतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 06:25 IST2026-04-03T06:25:38+5:302026-04-03T06:25:57+5:30

Today Daily Horoscope 03 April 2026: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

today daily horoscope 03 april 2026 know what your rashi says rashi bhavishya in marathi | आजचे राशीभविष्य, ०३ एप्रिल २०२६: परदेशवारीची संधी, यश-प्रगती; पण अचानक खर्च वाढतील

आजचे राशीभविष्य, ०३ एप्रिल २०२६: परदेशवारीची संधी, यश-प्रगती; पण अचानक खर्च वाढतील

मेष: आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. घरातील वातावरण आनंदी राहील. आर्थिक लाभ संभवतात. व्यवसायातील प्रगती समाधान कारक असेल. सामाजिक पत-प्रतिष्ठा वाढेल. मित्र व कुटुंबियांसह सहलीस जाऊ शकाल. वस्त्रालंकार लाभतील. आणखी वाचा 

वृषभ: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. अचानकपणे खर्च करावे लागतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील. दुपारनंतर परिस्थितीत बदल होईल. कौटुंबिक वातावरणात आनंद पसरेल. कार्यात यशस्वी व्हाल. नोकरी-व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. आणखी वाचा 

मिथुन: आज उत्साहाचा अभाव राहील. कुटुंबातील व्यक्तींशी वाद होण्याची शक्यता आहे. स्थावर संपत्तीशी संबंधित व्यक्तींपासून सावध राहावे लागेल. अचानक धन खर्च होईल. वाद होण्याच्या शक्यतेमुळे बौद्धिक चर्चेत सहभागी न होणे हितावह राहील. आणखी वाचा 

कर्क: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. गूढ विद्येची आवड निर्माण होईल. दुपार नंतर काही ना काही कारणाने चिंतीत व्हाल. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. खर्चात वाढ होईल. आणखी वाचा 

सिंह: आज बौद्धिक क्षमतेत वाढ झाल्याने चर्चेत सहभागी होऊ शकता पण वाद टाळावे लागतील. घरातील सदस्यांबरोबर वेळ चांगला जाईल. आर्थिक लाभ संभवतात. दुपारनंतर मात्र सावध राहावे लागेल. भावंडांकडून लाभ होईल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल. आणखी वाचा 

कन्या: आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. प्रभावी वक्तृत्वाने आपण प्रेमळ व लाभदायी संबंध प्रस्थापित करू शकाल. आपले विचार इतरांना पटवून देऊ शकाल. व्यवसायात फायदा होईल. मन आनंदित राहील. आर्थिक लाभ संभवतो. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. बौद्धिक चर्चेत सहभागी होऊ शकाल. आणखी वाचा 

तूळ: रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. बोलण्यावर संयम ठेवल्यामुळे वातावरण शांत करण्यात सफल व्हाल. निर्णय विचारपूर्वक घ्यावे लागेल. गैरसमज दूर करावे लागतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. दुपारनंतर मात्र प्रसन्नता लाभेल. आर्थिक लाभ संभवतात. आणखी वाचा 

वृश्चिक: विवाहेच्छुकांचा विवाह ठरण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. प्राप्ती व व्यापारात वाढ होण्याची शक्यता आहे. मित्रांसह सहलीस जाऊ शकाल. त्यांच्या सहवासात आपला वेळ आनंदात जाईल. दुपारनंतर मात्र स्वभावात संताप आणि उग्रपणा वाढण्याची शक्यता आहे. सबब कोणाशीही उग्रतापूर्ण व्यवहार करू नका. मित्रांशी मतभेद झाल्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. आणखी वाचा 

धनु:  कामाची योजना यशस्वीपणे पूर्ण होईल. व्यावसायिक यश प्राप्ती होईल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. श्रमाच्या अपेक्षानुरूप पदोन्नती होईल. कुटुंबात आनंद उल्हासाचे वातावरण राहील. मित्रांच्या भेटीने मन प्रफुल्लित राहील. प्रवास संभवतात. धनलाभाच्या दृष्टिने आजचा दिवस शुभ आहे. संततीविषयक एखादी चांगली बातमी मिळेल. आणखी वाचा 

मकर: परदेशगमनाची अपेक्षा करणार्‍यांना यशप्राप्ती संभवते. एखादा प्रवास संभवतो. कुटुंबीयांमध्ये आनंद उत्हासाचे वातावरण राहील. नोकरीत पदोन्नती संभवते. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. धनलाभ व सामाजिक मान-सन्मान होतील. पित्याकडून लाभ होतील. वैवाहिक जीवनात मतभेद संभवतात. आणखी वाचा 

कुंभ: आजचा दिवस काहीसा प्रतिकूल असल्याने नव्या कामाची सुरुवात आज न करणे हितावह राहील. आहाराकडे लक्ष द्यावे लागेल. वाणीवर संयम ठेवलात तरच कोणाशी वाद किंवा मतभेद टाळू शकाल. दुपारनंतर प्रसन्नता वाढेल. एखाद्या धार्मिक कार्याचे किंवा प्रवासाचे नियोजन करू शकाल. भावंडांकडून लाभ संभवतात. आर्थिक लाभ होतील. आणखी वाचा 

मीन: आज व्यापारी भागीदारीत लाभ होईल. एखाद्या मनोरंजनात्मक ठिकाणी स्नेह्यांसह आनंदात वेळ घालवल्याने मन प्रफुल्लित होईल. दुपारनंतर मात्र परिस्थितीत बदल झाल्याचा अनुभव येईल.  नवीन कार्यात अडचणी निर्माण होतील. शक्यतो प्रवास टाळा. क्रोधावर नियंत्रण ठेवा. कुटुंबियांशी भांडण होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा 

 

Open in app

Web Title : आज का राशिफल: 3 अप्रैल, 2026 - सभी राशियों के लिए भविष्यवाणियां

Web Summary : 3 अप्रैल, 2026 का दैनिक राशिफल सभी बारह राशियों के लिए अंतर्दृष्टि प्रदान करता है। मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ और मीन राशि के लिए सितारे क्या लेकर आए हैं, यह जानें। विस्तृत भविष्यवाणियों के लिए और पढ़ें।

Web Title : Today's Horoscope: April 3, 2026 - Predictions for All Zodiac Signs

Web Summary : Daily horoscope for April 3, 2026, provides insights for all twelve zodiac signs. Find out what the stars have in store for Aries, Taurus, Gemini, Cancer, Leo, Virgo, Libra, Scorpio, Sagittarius, Capricorn, Aquarius, and Pisces. Read more for detailed predictions.