आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 07:20 IST2025-11-01T07:09:01+5:302025-11-01T07:20:12+5:30
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
Today Daily Horoscope:
मेष: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. स्नेही, स्वकीय व मित्रांसह सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मित्रांकडून लाभ होतील. त्यांच्यासाठी पैसा खर्च करावा लागेल. काही व्यवहार वाढतील. एखाद्या रम्य स्थळी सहलीस जाण्याचा बेत आखू शकाल. अचानक धनलाभ संभवतो. संततीकडून एखाद्या लाभाची अपेक्षा बाळगू शकता. आणखी वाचा
वृषभ: आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. नवीन कामाच्या योजना यशस्वीपणे आखू शकाल. नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. अपूर्ण कामे तडीस जातील. बढती मिळून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. घरात वर्चस्व राहील व आपलेपणा वाढेल. भेटवस्तू व मान-सन्मान प्राप्त झाल्याने मन प्रसन्न होईल. आणखी वाचा
मिथुन: आज दिवसभर थोड्या प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागेल. शरीरात उत्साहाचा अभाव राहील. त्यामुळे नियोजित काम पूर्ण होणार नाही. मानसिक चिंता राहील. नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी सहकार्यांचा मंद प्रतिसाद आपला उत्साहभंग करेल. वरिष्ठ अधिकार्यांशी वादविवाद करू नका. प्रतिस्पर्ध्यां पासून सावध राहा. आणखी वाचा
कर्क: आज नकारात्मक विचारांचा पगडा राहील. संतापाचे प्रमाण वाढेल. आरोग्याच्या तक्रारी राहतील. वाणीवर पण नियंत्रण ठेवा. कुटुंबियांशी वादविवाद होण्याची शक्यता आहे. आर्थिक टंचाई जाणवेल. अशा वेळी मानसिक शांततेसाठी प्रयत्न करावेत. आणखी वाचा
सिंह: आज आपल्या दांपत्य जीवनात किरकोळ गोष्टीवरून जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. प्रापंचिक गोष्टीपासून मन अलिप्त होईल. व्यापारीवर्गाने भागीदारांशी धैर्याने वागावे. सार्वजनिक जीवनात अपयश येणार नाही याची काळजी घ्या. आणखी वाचा
कन्या: आज प्रत्येक गोष्ट अनुकूल राहील. घरात सुख - शांती नांदेल. त्यामुळे मन प्रसन्न राहील. सुखदायक घटना घडतील. आर्थिक लाभ होतील. कामाच्या ठिकाणी सर्वांचे सहकार्य लाभेल. प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान स्वीकारून त्यात यशस्वी व्हाल. आणखी वाचा
तूळ: आज बौद्धिक कामे व चर्चा यांत अग्रस्थानी राहाल. आपली कल्पनाशक्ती व सृजनशक्ती यांतील प्रगती समाधान देईल. विनाकारण वाद-विवाद व चर्चेत पडू नका. प्रिय व्यक्तीचा सहवास सुखदायक ठरेल. आणखी वाचा
वृश्चिक: आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य जाणवेल. वडीलधार्यांशी पटणार नाही व त्यामुळे मनाला वेदना होतील. आर्थिक नुकसान व सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होईल. जमीन, वाहन इत्यादींचे सौदे किंवा कागदपत्रे करण्या विषयी जपून राहावे. आणखी वाचा
धनु: आज एखाद्या गूढ व रहस्यमय विद्येचे आकर्षण होईल. नवीन कार्यारंभास आजचा दिवस अनुकूल आहे. मित्र व आप्तेष्टांच्या आगमनाने घरात आनंद राहील. हाती घेतलेली कामे यशस्वी होतील. जवळचा प्रवास घडेल. धनलाभ संभवतो. लहान भावंडांशी चांगले सुत जमेल. मान-प्रतिष्ठा वाढेल. प्रिय व्यक्तीचा सहवास घडू शकेल. आणखी वाचा
मकर: आज आपली उक्ती व कृती यावर संयम ठेवावा लागेल. कुटुंबियांशी मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. शेअर बाजार यात गुंतवणूक कराल. आर्थिक लाभ होईल. नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने लाभ होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष केंद्रित करावे लागेल. आणखी वाचा
कुंभ: आज शारीरिक व मानसिक दृष्टया प्रफुल्लित राहाल. नातलग, मित्र, कुटुंबीय यांच्यासह घरात उत्सवाचे वातावरण राहील. स्वादिष्ट भोजन मिळेल. पर्यटनाचा बेत आखाल. आर्थिक दृष्टया आजचा दिवस लाभदायी आहे. गूढ विषयांची गोडी लागेल. आणखी वाचा
मीन: आज आर्थिक नियोजन व गुंतवणूक करताना खूप दक्ष राहावे लागेल. एकाग्रता कमी असल्याने आपण बेचैन राहाल. मंगल कार्यावर खर्च होईल. मित्र - स्वकीयांशी मतभेद होतील. लालसा नुकसान करेल. आणखी वाचा
