12 सप्टेंबर, 2025 शुक्रवारी मेष राशीचा चंद्र आज आपल्या सहावा असेल. आजचा दिवस बौद्धिक कार्य, जनसंपर्क व इतरांत मिळून- मिसळून राहण्याच्या दृष्टीने चांगला आहे. जवळचा प्रवास संभवतो. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. दुपार नंतर मित्र व कुटुंबियांसह प्रवासाचे आयोजन करू शकाल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. वैचारिक पातळीवर अती उत्साहास आवर घालावा लागेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.