राशी भविष्य

धनु

आज चंद्र 01 मे, 2024 बुधवारी मकर राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. वायफळ खर्च होतील. मनास मरगळ येईल. कुटुंबीयांशी गैरसमज झाल्याने मनस्ताप होईल. कामात अपेक्षित यश मिळणार नाही. व्दिधा मनःस्थितिमुळे कोणताही महत्वाचा निर्णय आपण घेऊ शकणार नाही. दूर राहणार्‍या नातलगांशी संपर्क साधू शकाल. कामाचा व्याप वाढेल.