Daily Top 2Weekly Top 5

राशी भविष्य

कुंभ

आज चंद्र 20 मे, 2026 बुधवारी मिथुन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपण बौद्धिक क्षमता, लेखनकार्य व नवनिर्मिती व्यवस्थित पूर्ण करू शकाल. विचार एकाच गोष्टीवर स्थिर राहणार नाहीत व त्यात सातत्याने बदल होत राहील. स्त्रीयांनी आपली वाणी संयमित ठेवावी. शक्यतो आज प्रवास टाळावेत. संतती संबंधी प्रश्न भेडसावतील. आज नवीन काम सुरू न करणे हितावह राहील. अचानक खर्च उदभवण्याची शक्यता असल्याने त्याची तरतूद करून ठेवावी.