राशी भविष्य

मेष

आज चंद्र रास बदलून 28 एप्रिल, 2024 रविवारी धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आपण ठरविलेले काम सहज पूर्ण कराल, परंतु आपण जो प्रयत्न करीत आहात तो चुकीच्या दिशेने होत आहे असे वाटत राहील. एखाद्या मंगल कार्याला उपस्थिती लावाल. प्रवास संभवतो. रागावर ताबा ठेवावा लागेल. संतापामुळे नोकरी - व्यवसायात किंवा घरी मतभेद होतील.