आज चंद्र 26 डिसेंबर, 2025 शुक्रवारी कुंभ राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बाराव्या भावात असणार आहे. आज कमी वेळात जास्तीत जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा व पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या. चित्ताची एकाग्रता कमी राहील. शरीर स्वास्थ्य बिघडेल. संततीची समस्या चिंतेत टाकील. स्वकीयां पासून दूर जाण्याचे प्रसंग येतील. परोपकारी कार्यावर खर्च होईल. महत्वाची कागदपत्रे किंवा कोर्ट - कचेरीतील प्रकरणे ह्या पासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. आजचा दिवस आर्थिक देवाण - घेवाणीसाठी अनुकूल नाही.