आज चंद्र 25 जुलै, 2025 शुक्रवारी कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आज काम होण्यास वेळ लागला तरी प्रयत्न चालू ठेवणे हितावह राहील. कामे नक्की पूर्ण होतील. आर्थिक योजनात सुरुवातीला काही अडचणी येतील पण नंतर मार्ग मोकळा होताना दिसेल. नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी सहकार्यांशी खेळीमेळीच्या वातावरणात कामे करू शकाल. मित्र व शुभेच्छुकांचा सहवास लाभल्याने मनास आनंद मिळेल.