12 सप्टेंबर, 2025 शुक्रवारी मेष राशीचा चंद्र आज आपल्या दशमात असेल. आज कौटुंबिक व व्यावसायिक जीवन आनंदी राहील. ह्या दोन्ही ठिकाणी महत्वाच्या चर्चेत आपण सहभागी व्हाल. कामाचा व्याप वाढल्याने प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होईल. दुपार नंतर प्रकृतीत सुधारणा होऊ लागेल. मित्र भेटीने आपण आनंदित व्हाल. त्यांच्यासह एखाद्या सहलीचे नियोजन करू शकाल. सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकाल.