राशी भविष्य

मेष

आज चंद्र 25 एप्रिल, 2025 शुक्रवारी मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा भावात असणार आहे. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. आपली सर्व कामे सहजपणे पूर्ण होतील. त्यामुळे आपला उत्साह वाढेल. एखादा आर्थिक लाभ संभवतो. कुटुंबियांसह आनंदात वेळ जाईल. मातृ घराण्या कडून फायदा होईल. मित्र, स्नेही व सोबती भेटल्याने घरातील वातावरण आनंदी राहील.