राशी भविष्य

कुंभ

आज चंद्र 25 एप्रिल, 2025 शुक्रवारी मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आज आपल्या द्विधा मनःस्थिती मुळे निर्णय शक्तीचा अभाव जाणवेल. त्यामुळे विपरीत परिणाम होईल.प्रकृती सुद्धा साथ देणार नाही. वाणीवर ताबा न राहिल्याने वाद - विवाद होऊन आपल्याच लोकांशी मतभेद होतील. कामात अल्प प्रमाणात यश मिळेल. नाहक खर्च व धनहानी होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अडचणी येतील.