Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 07:40 IST2025-12-20T07:39:27+5:302025-12-20T07:40:25+5:30
Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगतेय तुमची राशी?

Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
मेष : आज आपणाला उत्साह अजिबात वाटणार नाही. प्रत्येक गोष्टीचा राग आल्याने आपली कामे बिघडतील. नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी किंवा घरात आपल्यामुळे कोणाचे मन दुखावणार नाही, ह्याची काळजी घ्यावी लागेल.
आणखी वाचा
वृषभ: आज शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. अशा परिस्थितीत नवीन कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. शक्यतो प्रवास टाळावेत. आज नियोजीत वेळेत आपले काम पूर्ण होऊ शकणार नाही.
आणखी वाचा
मिथुन: आजचा दिवस मनोरंजन व आनंद - प्रमाद करण्याचा आहे. मित्र व कुटुंबीयांसह आनंदी वातावरणात दिवस घालवाल. सामाजिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल.
आणखी वाचा
कर्क: आजचा दिवस आनंददायी व यशदायी आहे. कुटुंबीयांसह आनंदात वेळ जाईल. महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील. नोकरीतील वातावरण अनुकूल राहील.
आणखी वाचा
सिंह: सृजनशीलता विकसित होऊन नवनिर्मिती सुंदर प्रकारे करता येईल. संततीकडून आनंददायी बातमी मिळेल. मित्रांचा सहवास आनंद देईल. हातून एखादे परोपकाराचे कार्य घडेल.
आणखी वाचा
कन्या: आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. अनेक गोष्टींची काळजी लागून राहील. कुटुंबियांशी मतभेद होतील. आईची प्रकृती बिघडेल. कागदपत्रांवर विचारपूर्वक सही करावी. अतिरिक्त पैसा खर्च होईल.
आणखी वाचा
तूळ: आज नशिबाची साथ लाभेल. भावंडांशी सौहार्दतेचे संबंध राहतील. नवीन कार्यारंभास आजचा दिवस अनुकूल आहे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.
आणखी वाचा
वृश्चिक: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. विचारांवर असलेला नकारात्मक पगडा दूर सारावा लागेल. एखाद्या मांगलिक कामासाठी खर्च करावा लागेल.
आणखी वाचा
धनु: नियोजित कामे करु शकाल. आर्थिक फायदा होईल. प्रवास संभवतात. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. आजचा आपला व्यवहार सामान्य राहील. रुचकर भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. सामाजिक क्षेत्रात यश व कीर्ती लाभ होईल.
आणखी वाचा
मकर: आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. कामांमध्ये सहकार्यांचा हस्तक्षेप वाढेल. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. कामांमध्ये सहकार्यांचा हस्तक्षेप वाढेल. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. एखादा अपघात संभवतो.
आणखी वाचा
कुंभ: नवीन कार्य सुरु करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. नोकरी - व्यवसायात फायदा संभवतो. एखाद्या स्त्रीमुळे आपली कामे होतील. आज मोठे आर्थिक लाभ होतील. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील.
आणखी वाचा
मीन: कामे यशस्वीपणे होऊ शकतील. व्यापार वृद्धी होईल. वडील व वडिलधाऱयां कडून फायदा होईल. एखादा मोठा आर्थिक लाभ संभवतो.पदोन्नती संभवते. कौटुंबिक जीवन आनंददायी राहील. सरकार कडून फायदा होईल.
आणखी वाचा
