Yearly Horoscope 2025: धनु राशीसाठी कसे असेल हे वर्ष? वाचा, वार्षिक राशिभविष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 12:22 IST2025-01-01T12:21:46+5:302025-01-01T12:22:46+5:30

Yearly Horoscope 2025: सन २०२५ अनेकार्थाने महत्त्वाचे मानले जात आहे. नवग्रहांपैकी सर्वांत प्रभावी मानले जाणारे गुरु, शनि आणि राहु-केतु हे ग्रह या वर्षी राशी गोचर करणार आहे. त्याचा देश-दुनियेवर प्रभाव पडणार असून, धनु राशीवर कसा प्रभाव असेल? जाणून घ्या...

yearly horoscope 2025 know about effect and impact on sagittarius zodiac signs dhanu rashi varshik rashi bhavishya 2025 in marathi | Yearly Horoscope 2025: धनु राशीसाठी कसे असेल हे वर्ष? वाचा, वार्षिक राशिभविष्य

Yearly Horoscope 2025: धनु राशीसाठी कसे असेल हे वर्ष? वाचा, वार्षिक राशिभविष्य

Yearly Horoscope Sagittarius 2025: धनु राशीचे वार्षिक राशीभविष्य २०२५: या वर्षाची सुरवात आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. वर्षाच्या सुरवातीस आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. प्रवासादरम्यान किंवा वाहन चालवताना आपल्या प्रकृतीची काळजी अवश्य घ्यावी. वर्षाच्या सुरुवातीस एखादी दुखापत होण्याची संभावना असल्याने वाहन चालवताना सावध राहावे. आरोग्य विषयक समस्यांवर आपणास लक्ष द्यावेच लागेल. 

नोकरी करणाऱ्यांना कार्यस्थळी प्रयत्नशील राहावे लागेल. कारण काहीही असो आपले कामात मन रमणार नाही व त्यामुळे कार्यस्थळी आपणास समस्यांना सामोरे जावे लागू शकते. वर्षाच्या सुरवातीस आपले विरोधक थोडे मजबूत होण्याची शक्यता असल्याने आपणास सुद्धा मजबूत होण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. 

व्यापाऱ्यांना सरकारी क्षेत्राकडून मोठी ऑर्डर मिळू शकते. आंतरराष्ट्रीय व्यापारात सुद्धा आपण चांगले परिणाम मिळण्याची अपेक्षा बाळगू शकता. वर्षाच्या उत्तरार्धात आपल्या व्यवसायात उत्तम प्रगती होऊ शकेल. विवाहितांना वर्षाच्या सुरवातीस आपला अहं बाजूस सारावा लागेल. अहंमुळे त्यांच्या नात्यात कटुता निर्माण होऊ शकते. मात्र, त्या नंतरच्या दिवसात सुधारणा होऊन आपण आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. हे वर्ष प्रेमीजनांकडून खूप मोठी आशा बाळगून आहे. वर्षाच्या सुरवातीस आपल्या प्रेमिकेसह एखादा प्रवास करून आपले नाते अधिक दृढ कराल. आपण एकमेकांवर पूर्ण विश्वास दाखवू शकाल. वर्षाच्या मध्यास आपणास आपल्या नात्यात काही चांगले परिणाम देखील मिळू शकतात. 

विद्यार्थ्यांना या वर्षी कठोर परिश्रम करावे लागतील. आपण जितके जास्त परिश्रम कराल तितके चांगले परिणाम मिळवू शकाल. वर्षाच्या सुरवातीस परदेशात जाण्याची संधी आपणास मिळू शकते. या वर्षाच्या सुरवातीस खर्च वाढतील. आपण त्यावर नियंत्रण ठेवले नाहीत तर आपली बचत सुद्धा संपून जाईल. त्या नंतर आपण हळूहळू आर्थिक आव्हानातून बाहेर पडून व अन्य ठिकाणाहून प्राप्ती करून आपली आर्थिक स्थिती सुधारण्याच्या प्रयत्नात यशस्वी होऊ शकाल.
 

Web Title: yearly horoscope 2025 know about effect and impact on sagittarius zodiac signs dhanu rashi varshik rashi bhavishya 2025 in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app