Vivah Rekha: तळहातावरील विवाह रेषा पाहून तुम्हीच जाणून घ्या तुमच्या सांसारसुखाचे भाकीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 13:21 IST2022-07-19T13:20:54+5:302022-07-19T13:21:25+5:30

Marriage Line in Palm: हस्तरेषेमध्ये विवाह रेषेला खूप महत्त्व दिले गेले आहे. यावरून व्यक्तीच्या वैवाहिक आयुष्याविषयी आणि जोडीदाराविषयी अनेक रंजक गोष्टी जाणून घेता येतात. यात जीवन साथीदाराची आर्थिक स्थिती देखील जाणून घेता येते. 

Vivah Rekha: Know the prediction of your married life happiness by seeing the marriage line on the palm! | Vivah Rekha: तळहातावरील विवाह रेषा पाहून तुम्हीच जाणून घ्या तुमच्या सांसारसुखाचे भाकीत!

Vivah Rekha: तळहातावरील विवाह रेषा पाहून तुम्हीच जाणून घ्या तुमच्या सांसारसुखाचे भाकीत!

प्रेम आणि वैवाहिक जीवन कसे असेल, हे हस्तरेषेच्या विवाह रेषेच्या स्थितीवरून कळू शकते. एखाद्या व्यक्तीचे लग्न कधी होईल, त्याला जीवनसाथी कसा मिळेल, त्याची आर्थिक स्थिती काय असेल, व्यक्तीचे वैवाहिक जीवन कसे असेल? इ. गोष्टी विवाह रेषेवरून कळू शकतात. ते कसे ओळखायचे ते जाणून घेऊ. 

>>हातातील सर्वात लहान बोटाखाली अर्थात करंगळी खाली लहान आडव्या रेषा असतात, या रेषा तळहाताच्या बाहेरून आतील बाजूस येतात. त्यांना विवाह रेषा (Marriage Line in Palm) म्हणतात. या रेषा हृदय रेषेच्या वर असतात.

>>ज्या लोकांच्या हातात स्पष्ट विवाह रेषा असते आणि चंद्र पर्वतावरून येणारी रेषा भेटते, अशा व्यक्ती विवाहाच्या बाबतीत खूप भाग्यवान असतात. त्यांना श्रीमंत जीवनसाथी मिळतो. सासरच्या मंडळींकडून भरपूर संपत्ती आणि ऐश्वर्य मिळते. 

>>जर चंद्र पर्वतावरून एखादी रेषा लग्न रेषेसोबत पुढे सरकत असेल तर अशा व्यक्तीला जीवनसाथीकडून खूप प्रेम मिळते. त्यांच्या वैवाहिक जीवनात नेहमीच प्रेम मिळते.

>>ज्या लोकांची विवाह रेषा पुसट आणि पातळ असते, ते आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक नसतात. या लोकांमध्ये एकापेक्षा जास्त प्रेमसंबंध असू शकतात. त्यांची ओढ विवाहबाह्य संबंधांमध्ये दिसून येते. 

>>जर विवाह रेषा ठळक असेल तर अशा लोकांच्या वैवाहिक जीवनात नेहमी प्रेम आणि उत्साह असतो. पुसट विवाह रेषा (Marriage Line in Palm) असणाऱ्या जोडप्यांमध्ये उदासीनता दिसून येते.

>>ज्या लोकांच्या हातात २ समान विवाह रेषा असतात, त्यांची २ लग्न होण्याची शक्यता असते. तसेच २ रेषा असून जर रेषा तुलनेने पुसट आणि कमी जास्त असेल, तर अशा व्यक्तीचे लग्न एकदाच होते परंतु त्यांचे प्रेमसंबंध असू शकतात. 

Open in app

Web Title: Vivah Rekha: Know the prediction of your married life happiness by seeing the marriage line on the palm!