Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 08:46 IST2025-07-06T08:45:58+5:302025-07-06T08:46:47+5:30

Today's Horoscope in Marathi: कोणत्या राशीच्या लोकांसाठी आर्थिक लाभ होण्याचा योग, कोणत्या राशीच्या लोकांना जपून राहावे लागणार? जाणून घ्या

Today's Horoscope: You will have difficulties in making important decisions; what does your zodiac sign say? | Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?

Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?

मेष : शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. दुपार नंतर नवीन कार्यारंभ करण्यात अडचणी येतील. आपल्या कृती संयमित ठेवणे हितावह राहील. राग, द्वेष यांपासून दूर राहावे लागेल.
आणखी वाचा

वृषभ : व्यापार - व्यवसायात यश प्राप्ती होईल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. आर्थिक लाभ संभवतात. प्रतिस्पर्ध्यांना चकवा देऊ शकाल. दुपार नंतर चांगले मनोरंजन होईल.
आणखी वाचा

मिथुन :कामात अडचणी येतील. वाद होण्याची शक्यता असल्याने बौद्धिक चर्चेत आज सहभागी न होणे हितावह राहील. संतती विषयक काळजी निर्माण होईल. दुपार नंतर घरातील वातावरण शांत असल्याने मानसिक दृष्टया आपणास ताजेतवाने वाटेल.
आणखी वाचा

कर्क : आज काही ना काही कारणाने आपणास नैराश्य येईल. त्याचा आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होईल. शक्यतो आज प्रवास टाळावेत. स्थावर संपत्तीचा व्यवहार न करणे हितावह होईल. आईची तब्बेत बिघडू शकते.
आणखी वाचा 

सिंह - आज अचानकपणे प्रवास घडतील. नवीन कार्यारंभ कराल. परदेशातून लाभदायक बातमी मिळण्याची शक्यता आहे. फायदेशीर गुंतवणूक करू शकाल. दुपार नंतर अधिक भावनाशील व्हाल. मनात निराशेची भावना वाढू शकेल.
आणखी वाचा 

कन्या - आज निर्णय घेण्यात त्रास होण्याची शक्यता असल्याने नवीन कामाची सुरवात आपण यशस्वीपणे करू शकणार नाही. आज मतभेद होण्याची शक्यता असल्याने शक्यतो मौन पाळावे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सामान्य राहील. दुपार नंतर वातावरण एकदम पालटेल.
आणखी वाचा 

तूळ - आज दिवसाच्या प्रारंभी आपले विचार दृढ व समतोल असतील. शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. नवी वस्त्रे व अलंकार ह्यावर जास्त खर्च होईल. दुपार नंतर आपली मानसिकता बदलेल. कुटुंबीयांशी मतभेद होतील. महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील.
आणखी वाचा 

वृश्चिक - आज आपल्या मनाला शांतता लाभेल. मनात येणार्‍या नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवावे लागेल. कोर्ट- कचेरीच्या कामात सावध राहावे लागेल. शारीरिक स्वास्थ्य बिघडण्याची शकयता आहे.
आणखी वाचा

धनु - प्राप्तीत वाढ संभवते. सामाजिक कार्यात सहभागी झाल्याने मन प्रसन्न होईल. मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल. व्यापारात लाभ संभवतो. अपघाताची शक्यता आहे. शारीरिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा

मकर - आजचा दिवस स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी उत्तम आहे. व्यावसायिक क्षेत्रात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. बढती संभवते. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. 
आणखी वाचा

कुंभ - आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आपल्या वाणीवर संयम ठेवावा लागेल. संततीच्या आरोग्याची काळजी निर्माण होईल. दूरवरच्या प्रवासाची योजना आखू शकाल. दुपार नंतर व्यवसायातील वातावरण अनुकूल होईल. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल.
आणखी वाचा

मीन - आज वाद होण्याची शक्यता असल्याने आपल्या वाणी व क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. गूढ विद्येचे आकर्षण होईल. सुखदायी बाबींत गोडी वाटेल. गहन चिंतन मनाला शांती देईल. दुपार नंतर अनुकूलता लाभेल.
आणखी वाचा 

Web Title: Today's Horoscope: You will have difficulties in making important decisions; what does your zodiac sign say?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app