Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ जानेवारी २०२६ : दिवस अत्यंत आनंददायी, पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 07:17 IST2026-01-03T07:16:11+5:302026-01-03T07:17:11+5:30
Daily Horoscope Marathi: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?

Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ जानेवारी २०२६ : दिवस अत्यंत आनंददायी, पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल!
मेष: आज आपणाला नवीन कार्य करण्याची प्रेरणा झाली तरी विचारात स्थिरतेचा अभाव असल्यामुळे काही बाबींत त्रास होईल. नोकरी - व्यवसायात स्पर्धात्मक वातावरण असेल.
आणखी वाचा
वृषभ: आज आपल्या मनाची दोलायमान अवस्था महत्वाच्या संधीपासून आपणाला दूर ठेवेल. आज नवे कार्य सुरू करणे उचित ठरणार नाही. चर्चेत आपल्या फसव्या व्यवहारामुळे संघर्ष निर्माण होईल. आर्थिक लाभ होईल.
आणखी वाचा
मिथुन: स्वादिष्ट व रूचकर भोजनाचा आस्वाद घेऊन, वस्त्रालंकार मिळवून तसेच मित्र व कुटुंबीय यांच्या सहवासामुळे मानसिक दृष्टया दिवस अत्यंत आनंददायी ठरेल. प्रकृती उत्तम राहील. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल. नकारात्मक विचार मनात येऊ न देणे हितावह राहील.
आणखी वाचा
कर्क: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उदभवतील व त्यामुळे मानसिक दृष्टया आपण अस्वस्थ राहाल. द्विधा मनःस्थिती राहिल्याने महत्वाचे निर्णय लांबणीवर टाका. कोणाशी गैरसमज किंवा वादविवाद होण्याची शक्यता आहे. स्वास्थ्याकडे दुर्लक्ष केल्याने प्रकृती बिघडेल.
आणखी वाचा
सिंह: स्त्रीया व मित्रवर्गाकडून लाभाची शक्यता आहे. रम्य स्थळी प्रवासाला जाल. निर्णय न घेण्याच्या वृत्तीमुळे हाती आलेली संधी गमावून बसाल म्हणून महत्वाचे निर्णय लांबणीवर टाकणे हितावह राहील.
आणखी वाचा
कन्या: दिवस शुभ फलदायी आहे. नव्या कार्याचे बेत तडीस जातील. व्यापारी व नोकरदारांसाठी दिवस अनुकूल आहे. व्यापारात फायदा व नोकरीत बढतीची शक्यता आहे. पित्याकडून लाभ संभवतात.
आणखी वाचा
तूळ: आपण बुद्धिवादी व साहित्य प्रेमी यांच्या सहवासात ज्ञानाच्या चर्चेत वेळ घालवाल. नवीन कामे हाती घ्याल. दूरचे प्रवास कराल. परदेशगमनाच्या संधी येतील व परदेशस्थ स्नेह्यांकडून बातम्या मिळतील.
आणखी वाचा
वृश्चिक: आजचा दिवस शांततेत व सावधानतेत घालवावा लागेल. नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता असल्याने आज नवीन कामे सुरू न करणे हितावह राहील.
आणखी वाचा
धनु: मेजवानी, सहल, प्रवास, रुचकर भोजन, सुंदर वस्त्र धारणा ही आजच्या दिवसाची विशेषता आहे. मनोरंजन विश्वात रमून जाल. भिन्नलिंगी व्यक्तीच्या सहवासात रमून जाल.
आणखी वाचा
मकर: आजचा दिवस व्यापार - व्यवसायास अनुकूल आहे. व्यापार वृद्धी होईल. आर्थिक व्यवहार यशस्वीपणे होतील. घरातील वातावरण आनंदी राहील. योग्य ठिकाणीच पैसा खर्च होईल.
आणखी वाचा
कुंभ: कोणत्याही नवीन कामाची सुरुवात न करणे हितावह राहील. विचारात सतत बदल होत असल्याचे दिसून येईल. महिलांनी बोलण्यावर संयम ठेवावा. प्रवास शक्यतो टाळावेत.
आणखी वाचा
मीन: मना विरुद्ध गोष्टी घडण्याचा आहे. त्यामुळे आपला उत्साह मावळेल. कुटुंबात वाद संभवतात. आईचे स्वास्थ्य बिघडून चिंता निर्माण होईल. मन नाराज राहील. स्वास्थ्य बिघडल्याने झोप लागणार नाही.
आणखी वाचा
