Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - १८ फेब्रुवारी २०२३, आर्थिक लाभ होतील, दांपत्य जीवनातगोडी राहील, मान-मरातब वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 07:44 IST2023-02-18T07:42:13+5:302023-02-18T07:44:59+5:30

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope : Today's horoscope - February 18, 2023 | Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - १८ फेब्रुवारी २०२३, आर्थिक लाभ होतील, दांपत्य जीवनातगोडी राहील, मान-मरातब वाढेल

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - १८ फेब्रुवारी २०२३, आर्थिक लाभ होतील, दांपत्य जीवनातगोडी राहील, मान-मरातब वाढेल

मेष - आज आपणास आपला संताप नियंत्रित ठेवावा लागेल. कोणत्याही कामात व्यत्यय येण्यास हा संताप कारणीभूत ठरेल. शरीरात उत्साहाची उणीव भासेल. मनाची अस्वस्थता कोणतेही काम करण्याची प्रेरणा देणार नाही.  आणखी वाचा

वृषभ - आज कार्यपूर्तीस होणारा विलंब व शारीरिक अस्वास्थ्य ह्यामुळे मनात नैराश्याची भावना बळावेल. कामाचा व्याप वाढल्याने मानसिक बेचैनी राहील. प्रवासात विघ्न येण्याची शक्यता आहे. आज नवे काम आज सुरू करू नये. आणखी वाचा

मिथुन -   आज शारीरिक व मानसिक उत्साहामुळे प्रसन्नता लाभेल. मित्र व कुटुंबीयांसह प्रवास किंवा मेजवानीचा बेत ठरवाल. मनोरंजनाची सर्व साधने आज उपलब्ध होतील. आणखी वाचा

कर्क  - आजचा दिवस यशदायी व आनंददायी आहे. कुटुंबियांसह घरात सुखा - समाधानात दिवस घालवाल. नोकरदारांना लाभ होतील. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. कार्यात यश मिळेल.  आणखी वाचा 

सिंह - आज आपणास लेखन व साहित्य क्षेत्रात काही नवनिर्मिती करण्याची प्रेरणा मिळेल. विद्यार्थी अभ्यासात चमकतील. प्रणयातील यश व प्रिय व्यक्तीशी झालेला सुसंवाद आपले मन आनंदित करेल.  आणखी वाचा

कन्या - आपणाला आज प्रतिकूलतेला तोंड दयावे लागेल. आरोग्य यथा तथाच राहील. मनाला चिंता लागून राहील. आईशी असणारे संबंध दुरावतील किंवा तिची प्रकृती बिघडेल. स्वकियांशीच खटके उडून मतभेद निर्माण होतील. आणखी वाचा 

तूळ -  नवीन कामाची सुरवात करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. आर्थिक लाभाची शक्यता आहे. कौटुंबिक किंवा व्यावहारिक कामा निमित्त बाहेर जावे लागेल. जवळपासच्या प्रवासाचा बेत आखाल. विदेशातून चांगल्या बातम्या येतील. आणखी वाचा

वृश्चिक - आज घरात सुख शांती नांदेल. नातलग व मित्रांचे आगमन होईल. स्वादिष्ट भोजन मिळेल. मांगलिक कार्यावर खर्च होईल. अलंकार व सुगंधी पदार्थांची खरेदी कराल. आणखी वाचा

धनु - आज आपण शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राखू शकाल. आर्थिक लाभ होतील. एखादा प्रवास कराल. सगे सोयरे व मित्रांच्या आगमनाने मन खुश होईल. दांपत्य जीवनात जवळीक व गोडी राहील. मान - मरातब वाढेल. आणखी वाचा 

मकर -  आज सावध राहावे लागेल. कठोर परिश्रमा नंतरही कमी यश मिळाल्याने मनात नैराश्याची भावना उत्पन्न होईल. घरगुती वातावरण पण शांत नसेल. आरोग्याची तक्रार राहील. एखादी दुर्घटना संभवते.  आणखी वाचा 

कुंभ - आजचा दिवस लाभदायी आहे. व्यवसायात लाभ होईल. मित्र भेटतील व त्यामुळे आपणास आनंद होईल. त्यांच्यासह प्रवास सुद्धा करण्याचे ठरवाल. आणखी वाचा  

मीन -   आजचा दिवस व्यापार - व्यवसायात लाभ मिळवून देणारा आहे. नोकरीत आपल्या यशामुळे वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. पदोन्नती संभवते. व्यापार्‍यांना व्यापारात लाभ व वृद्धी होईल. पित्याकडून लाभ होतील. आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope : Today's horoscope - February 18, 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app