Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 07:26 IST2025-12-23T07:23:47+5:302025-12-23T07:26:19+5:30

Daily Horoscope Marathi: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?

Today's Horoscope: Today's Horoscope, December 23, 2025: Those looking to get married will get married, you will be able to resolve differences by being tactful. | Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल

Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल

मेष

आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल. घराच्या सजावटीत बदल करण्याचा विचार मनात येईल. कार्यालयीन किंवा व्यापारी क्षेत्रातील अधिकारी वर्गाशी महत्वाची चर्चा होईल. आणखी वाचा

वृषभ

आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज नवीन काम करण्याची प्रेरणा मिळून त्याची आपण सुरुवात सुद्धा करु शकाल. एखादया रमणीय स्थळाला भेट देऊन आपले मन प्रसन्न होईल. दूरचे प्रवास संभवतात. आणखी वाचा

मिथुन

 आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज संतापाची भावना आपले नुकसान करेल. आजारी व्यक्तींची तपासणी किंवा शस्त्रक्रिया करावी लागेल. मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल. खर्चाचे प्रमाण वाढेल. आणखी वाचा

कर्क

आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज संवेदनशीलता व प्रेमाने व्याप्त होऊन आपले मन भिन्नलिंगी व्यक्तीकडे आकर्षित होईल. मौल्यवान मौज - मजेच्या वस्तू, वस्त्राभूषणे तथा वाहन इत्यादींची खरेदी होईल. आणखी वाचा

सिंह

आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज उदासीनता व साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल. दैनंदिन कामे पूर्ण व्हायला विलंब लागेल. खूप परिश्रम कराल पण त्यामानाने कमी फळ मिळेल. आणखी वाचा

कन्या

आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपणाला संतती समस्येमुळे चिंता राहील. अपचना सारख्या पोटाच्या तक्रारी राहतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येतील. बौद्धिक चर्चा व वाद - विवादात सहभागी होऊ नका.  आणखी वाचा

तूळ

आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपण खूप भावनाशील व्हाल व त्यामुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. आईशी मतभेद होतील किंवा तिच्या प्रकृतीची काळजी राहील.  आणखी वाचा

वृश्चिक

आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील. नशिबाची साथ मिळेल. भावंडांशी कौटुंबिक चर्चा व नियोजन होईल. तन - मन स्फूर्ती व चैतन्याने भरून जाईल. आणखी वाचा

धनु

आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कुटुंबियांशी गैरसमज निर्माण झाल्यामुळे मतभेद वाढतील. आज मानसिक व्यवहारात खंबीरता नसल्यामुळे कोणताही निर्णय घाईगडबडीने घेऊ नका. आणखी वाचा

मकर

आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजच्या दिवसाची सुरवात प्रसन्न वातावरणाने होईल. घरात मंगलमय वातावरण राहील. मित्र तसेच सगेसोयरे यांच्याकडून भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल. आणखी वाचा

कुंभ

आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज आर्थिक देवाण- घेवाण किंवा जामीनकीत आपली फसवणूक होण्याची शक्यता आहे. एकाग्रता न झाल्याने मानसिक अस्वास्थ्य वाढेल.प्रकृती विषयी समस्या उदभवतील.  आणखी वाचा

मीन

आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज समाजात सर्वश्रेष्ठ स्थान प्राप्त कराल. सामाजिक कामात भाग घ्यावा लागेल. वडिलधारी व मित्रांचा सहवास लाभेल. मित्रमंडळीत नव्या मित्रांची भर पडेल.  आणखी वाचा

Open in app

Web Title : आज का राशिफल, 23 दिसंबर 2025: विवाह और मौन से दूर करें मतभेद।

Web Summary : मेष राशि के लिए मिश्रित दिन; वृषभ राशि के लिए नई प्रेरणा। मिथुन: क्रोध पर नियंत्रण रखें। कर्क: विपरीत लिंग के प्रति आकर्षण। सिंह: बेचैनी महसूस होगी। कन्या: पेट की समस्या। तुला: भावनात्मक असंतुलन। वृश्चिक: वित्तीय लाभ। धनु: पारिवारिक गलतफहमी। मकर: सुखद दिन। कुंभ: वित्तीय धोखा संभव। मीन: सामाजिक पहचान।

Web Title : Horoscope for December 23, 2025: Marriages, resolve differences through silence.

Web Summary : Mixed day for Aries; new inspiration for Taurus. Gemini: control anger. Cancer: attraction to opposite sex. Leo: feel restless. Virgo: Stomach issues. Libra: Emotional imbalance. Scorpio: Financial gains. Sagittarius: Family misunderstandings. Capricorn: Pleasant day. Aquarius: Financial deception possible. Pisces: Social recognition.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.