Todays Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ६ सप्टेंबर २०२२: कर्कसाठी यशदायी तर कन्येसाठी प्रतिकूल दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 07:52 IST2022-09-06T07:50:32+5:302022-09-06T07:52:51+5:30

Today Daily Horoscope 6th September 2022 : कसे असेल तुमचे आजचे राशीभविष्य? जाणून घ्या, सविस्तर....

Today's Horoscope - September 6, 2022: Successful for Cancer and unfavorable for Virgo | Todays Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ६ सप्टेंबर २०२२: कर्कसाठी यशदायी तर कन्येसाठी प्रतिकूल दिवस

Todays Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ६ सप्टेंबर २०२२: कर्कसाठी यशदायी तर कन्येसाठी प्रतिकूल दिवस

मेष:  चंद्र धनू राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आपल्याला रागावर ताबा ठेवावा लागेल. अन्यथा आपल्या कामात बिघाड आणि  संबंधात कटुता निर्माण होईल. आणखी वाचा

वृषभ:  शारीरिक दृष्ट्या अस्वस्थ असल्याने कामात सफलता मिळण्यास उशीर होईल. त्यामुळे निराश व्हाल, आज शक्यतो नवे काम सुरू करू नका. योग्य आहार घ्या कामाचा व्याप वाढेल. आणखी वाचा

मिथुन:  आज शारीरिक आणि मानसिक उत्साहामुळे प्रसन्नता लाभेल. मित्र कुटुंबीयांसह प्रवास किंवा मेजवानीचा बेत  ठरवाल. मनोरंजनाची सर्व साधने आज उपलब्ध होतील. आणखी वाचा 

कर्क:  आजचा दिवस यशदायी आणि आनंददायी आहे. कुटुंबीयांसह सुखासमाधानात घरात दिवस घालवाल. नोकरदारांना लाभ होतील. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, कार्यात यश मिळेल. स्त्रीयांच्या सहवासात आनंदित व्हाल. आणखी वाचा 

सिंह:  आज आपणास लेखन आणि नवनिर्मितीच्या क्षेत्रात प्रेरणा मिळेल. विद्यार्थी अभ्यासात चमकतील. प्रणयातील यश आणि प्रिय व्यक्तीशी असलेला सुसंवाद आपलं मन आनंदित करेल. आणखी वाचा 

कन्या:  आज प्रत्येक कार्यात प्रतिकुलतेचा अनुभव येईल. आरोग्य बिघडेल. मन चिंताग्रस्त राहील. कुटुंबीयांशी पटणार नाही त्यामुळे घरात शांतता लाभणार नाही. सार्वजनिक क्षेत्रात मानहानीची शक्यता. आणखी वाचा 

तूळ:  आज एखाद्या मंगल कार्यानिमित्त प्रवासाचा बेत आखाल. भावंडांशी खेळीमेळीच्या वातावरणामुळे घरगुती प्रश्नांवर नीट चर्चा होईल. कामानिमित्त बाहेर जावे लागेल. परदेशातून चांगल्या बातम्या मिळतील. आणखी वाचा 

वृश्चिक: आज कौटुंबिक कलह होण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांशी गैरसमज होण्याची शक्यता आहे. मनात येणारे नकारात्मक विचार दूर सारावे लागतील. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडचणी येतील. आणखी वाचा 

धनु:  आज दिवस प्रवासाचा आहे. ठरलेली कामे पूर्ण होतील. शरीर व मन स्वस्थ राहिल्याने आनंदी आणि उत्साही राहाल. कुटुंबात मंगल कार्ये ठरतील. आणखी वाचा 

मकर:  आज एखाद्या गुढ विषयाची गोडी लागेल. आपण त्याच्यातच मग्न व्हाल. तसेच त्यासाठी खर्चदेखील कराल. कोर्ट-कचेरी संबंधी कामं निघतील. व्यावसायिक कामात विघ्ने येतील. आणखी वाचा 

कुंभ:  आजचा दिवस लाभदायी आहे. व्यवसायात लाभ होईल. मित्र भेटतील त्यामुळे आपणास आनंद होईल. त्यांच्यासह प्रवास सुरू करण्याचे ठरवाल,  नवीन कामाची सुरुवात फायदेशीर ठरेल. आणखी वाचा 

मीन:  आजचा दिवस व्यापार व्यवसायात लाभ मिळवून देणारा आहे. नोकरीत आपल्या यशामुळे वरिष्ठ आपल्यावर खूश होतील. पदोन्नत्ती संभवते.  व्यापाऱ्यांना व्यापारात लाभ आणि वृद्धी होईल. आणखी वाचा 

Web Title: Today's Horoscope - September 6, 2022: Successful for Cancer and unfavorable for Virgo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app