आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 07:16 IST2025-09-23T07:10:21+5:302025-09-23T07:16:12+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope, September 23, 2025: Those looking to get married will get married, there will be benefits from friends | आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल

आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल

मेष

आजचा दिवस दूरगामी आर्थिक योजनेसाठी अनुकूल आहे. तसेच आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया फायदेशीर आहे. शारीरिक व मानसिक उत्साहाचा अनुभव होईल. आणखी वाचा

वृषभ

23 सप्टेंबर, 2025 मंगळवार च्या दिवशी चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशी पासून पाचवा भावात असेल. आज आपल्या बोलण्याच्या जादूने कोणी प्रभावीत झाल्याने आपलाच फायदा होईल, तसेच मधुर व सौम्य वक्तव्याने नवे संबंध प्रस्थापित व्हायला मदत होईल. शुभ कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. आणखी वाचा

मिथुन

आज महत्त्वाचा निर्णय घेताना आपली द्विधा मनःस्थिती होईल. आई व स्त्रीयांच्या बाबतीत संवेदनशील व्हाल. विचारांची भाऊगर्दी मानसिक थकवा निर्माण करेल. निद्रानाश झाल्याने प्रकृती बिघडेल. आणखी वाचा

कर्क

 आज शारीरिक व मानसिक उत्साहा बरोबर घरातील वातावरणही आनंदी असेल. मित्र - स्नेहीजन ह्यांचा सहवास घडेल. मित्रांकडून लाभ होईल. मंगल कार्याची सुरूवात करायला आजचा दिवस अनुकूल आहे. आणखी वाचा

सिंह

आजचा दिवस कुटुंबियांसह सुख शांतीत घालवाल. त्यांचे सहकार्य मिळेल. स्त्री मित्रां कडून विशेष मदत प्राप्त होईल. दूरचे मित्र व स्नेही यांच्याशी संपर्क फायदेशीर ठरेल. आणखी वाचा

कन्या

23 सप्टेंबर, 2025 मंगळवार च्या दिवशी चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशी पासून प्रथम भावात असेल. आजच्या लाभदायक दिवसाने वैचारिक समृद्धी वाढेल. वाकचातुर्य व मधुरवाणी ह्यांच्या साह्याने मैत्रीपूर्ण संबंध विकसीत करू शकाल. उत्तम भोजन, भेटवस्तू, वस्त्र इत्यादींची प्राप्ती होईल. आणखी वाचा

तूळ

आज थोडा सुद्धा असंयम व अवैध व्यवहार आपणास अडचणीत आणेल. एखादी दुर्घटना संभवते. बोलण्यातील शिथीलता उग्र तक्रार वाढवण्याची शक्यता आहे. सगे सोयरे यांच्याशी पटणार नाही. आणखी वाचा

वृश्चिक

आज आपल्या कौटुंबिक जीवनात सुख - शांती नांदेल. पत्नी व संतती कडून चांगल्या बातम्या मिळतील. मंगलकार्ये ठरतील. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. नोकरी - व्यवसायात संधी मिळून उत्पन्न वाढेल. आणखी वाचा

धनु

आजचा दिवस कार्य साफल्याचा आहे. नवे काम सुरू कराल. व्यापारी आपल्या व्यवसायाचे नियोजन व विस्तार करू शकतील. मैत्रिणींकडून लाभ होईल. नोकरीत वरिष्ठ अधिकारी आपल्या बढतीचा विचार करतील. आणखी वाचा

मकर

आज बौद्धिक कार्य व व्यवसायात आपण नवी शैली वापराल. साहित्य व लेखन कार्याला गती मिळेल. शारीरिक अस्वास्थ्य व थकवा जाणवेल. संततीची समस्या चिंता वाढवील. आणखी वाचा

कुंभ

आज निषेधात्मक व नकारात्मक विचारां पासून दूर राहावे. वाद, भांडणे ह्या पासून दूर राहा. राग व बोलण्यावर संयम ठेवा. कौटुंबिक वातावरण कलुशित राहील. आर्थिक चणचण जाणवेल. आणखी वाचा

मीन

 दैनंदिन कामातून बाहेर पडून आज आपण सहलीसाठी किंवा मनोरंजनासाठी वेळ द्याल. स्वजनांसह सहलीस जाऊ शकता. सिनेमा, नाटक किंवा बाहेर भोजन करणे असा एखादा कार्यक्रम आखाल.  आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope, September 23, 2025: Those looking to get married will get married, there will be benefits from friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app