आजचे राशीभविष्य, १८ सप्टेंबर २०२३, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक दृष्टीने लाभदायी दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 07:41 IST2023-09-18T07:39:52+5:302023-09-18T07:41:06+5:30

Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी.

Today's horoscope, September 18, 2023, is a beneficial day in financial, social and family terms | आजचे राशीभविष्य, १८ सप्टेंबर २०२३, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक दृष्टीने लाभदायी दिवस

आजचे राशीभविष्य, १८ सप्टेंबर २०२३, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक दृष्टीने लाभदायी दिवस

मेष:   वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस फारच चांगला आहे. जोडीदारासह वैवाहिक जीवनाचा आनंद सुद्धा उपभोगू शकाल. आर्थिक लाभ तसेच प्रवास संभवतात. राग व अधिकार गाजविण्याची भावना वाढेल. आणखी वाचा 

वृषभ:  आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल. नियोजनाप्रमाणे सर्व कामे पार पडतील. आर्थिक लाभ संभवतात. स्त्रियांना माहेरहून एखादी चांगली बातमी मिळून काही लाभ होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा 

मिथुन:   आज शरीर व मन बेचैन राहील. नवीन कार्य सुरू करण्याचा बेत आखाल पण काम सुरू करण्यात अडचणी येतील. मानहानी होण्याची शक्यता आहे. संतती विषयक कामासाठी खर्च करावा लागेल. आणखी वाचा 

कर्क:  आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आज आनंद व उत्साह यांचा अभाव राहील. मन चिंतेने ग्रासलेले व अशांत राहील. घरात भांडणाचे वातावरण असेल. आप्तांबरोबर मतभेद होऊ शकतात. स्त्रियांबरोबर सुद्धा मतभेद व तणाव राहील. पैसा खर्च होईल.  आणखी वाचा 

सिंह:  आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आज आरोग्य उत्तम राहील. भावंडांसह आनंदात वेळ जाईल. त्यांच्या कडून फायदा होईल. एखादया सुंदर स्थळाला भेट देण्यास जाल. मित्र भेटतील. कार्य यशस्वी झाल्याने मित्र आनंदीत होतील. आणखी वाचा 

कन्या:  आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपल्या गोड बोलण्याने कोणाचेही मन जिंकू शकाल. कामे सफल होण्याची जास्त शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. त्यांच्यासह दिवस आनंदात जाईल. आर्थिक लाभ संभवतात. आरोग्य उत्तम राहील. प्रवासाचे बेत ठरतील.  आणखी वाचा 

तूळ: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. रचनात्मक व कलात्मक शक्तीची चमक दिसेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल. विधायक कार्य हातून घडेल. खंबीर विचाराने काम पूर्ण कराल. आर्थिक योजना ठरवाल.  आणखी वाचा    

वृश्चिक:   आज मनोरंजन, आनंद ह्यासाठी पैसा खर्च होईल. चिंता व शारीरिक कष्ट ह्यामुळे आपण त्रासून जाल. एखादा अपघात संभवतो. गैरसमज होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागेल. स्वभाव रागीट बनेल म्हणून भांडणापासून दूर राहावे लागेल. संबंधितां बरोबर काही अप्रिय घटना घडू शकते.  आणखी वाचा

धनू: आर्थिक, सामाजीक व कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी आहे. वैवाहिक जीवनात पूर्णतः आनंद मिळेल. प्रेमाचा सुखद आनंद घेऊ शकाल. मित्रांसह एखाद्या रम्य स्थळी फिरायला जावू शकाल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरण्याची शक्यता आहे. संतती व पत्नी ह्यांच्या कडून लाभ होईल.  आणखी वाचा  

मकर:   आजचा दिवस संघर्षाचा आहे. आज अग्नी, पाणी व वाहन ह्यापासून एखादा अपघात संभवतो. व्यापारात कार्यमग्न राहाल. व्यापारा निमित्त प्रवास करावा लागेल व त्याचा फायदा सुद्धा होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. नोकरीत बढती मिळेल. संततीच्या शिक्षणा विषयी समाधान वाटेल.  आणखी वाचा 

कुंभ:  आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. प्रकृती नरम गरम राहील. तरीही मनस्वास्थ्य चांगले राहील. कामाचा उत्साह कमी होईल. वरिष्ठांशी सांभाळून राहावे लागेल. अकारण खर्च वाढेल. आनंद - सोहळा, प्रवास- पर्यटन ह्यावर पैसा खर्च होईल.  आणखी वाचा 

मीन:   आज आपणास अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. मानसिक तसेच शारीरिक श्रमामुळे स्वास्थ्य खराब होऊ शकते. सर्दी, श्वसनाचा त्रास, खोकला व पोट दुखी यांचा जोर वाढेल. खर्चात वाढ होईल. शक्यतो जलाशया पासून दूर राहावे. आणखी वाचा 

Web Title: Today's horoscope, September 18, 2023, is a beneficial day in financial, social and family terms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app