आजचे राशीभविष्य - 17 डिसेंबर 2022; मित्रांकडून फायदा संभवतो, व्यापारात लाभ होईल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 07:45 IST2022-12-17T07:26:17+5:302022-12-17T07:45:41+5:30
Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

आजचे राशीभविष्य - 17 डिसेंबर 2022; मित्रांकडून फायदा संभवतो, व्यापारात लाभ होईल
मेष - आज चंद्र सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. आपण एखाद्या काल्पनिक विश्वात रमून जाल. कलावंतांना आपली कला प्रदर्शित करण्याची संधी लाभेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील. दैनंदिन कार्यात मात्र काही अडचणी निर्माण होतील. नोकरीत वरिष्ठांशी मतभेद संभवतात. उपाय:-सूर्यास रोज कुंकू मिश्रित पाण्याचा अर्घ्य द्यावा. आणखी वाचा
वृषभ - आज चंद्र सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज मातेच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. स्थावर संपत्ती संबंधित कागदपत्रावर सह्या करणे टाळावे. नकारात्मक विचार दूर सारावे लागतील. दुपार नंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुधारेल. विद्यार्थ्यांना अनुकूल दिवस आहे. सृजनशीलता वाढेल. हातून एखादे परोपकारी कार्य घडेल. उपाय:-रोज एक माळ गायत्री मंत्राचा जप करावा. आणखी वाचा
मिथुन - आज चंद्र सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस सुखा - समाधानात जाईल. भावंडांशी सौहार्दता निर्माण झाल्याने आपला फायदा होईल. स्नेहीजन व मित्रांचा सहवास घडेल. दुपार नंतर मात्र मनावर नकारात्मक विचारांचा पगडा बसेल. भोजनाची वेळ पाळू शकणार नाही. उपाय:-रोज शंकराला जलाभिषेक करावा. आणखी वाचा
कर्क - आज चंद्र सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज द्विधा मनःस्थितीमुळे आपणास दीर्घकालीन योजनेचे आयोजन करताना अडचणी येतील. कुटुंबियांशी वाद होतील. दुपार नंतर मात्र परिस्थितीत अनुकूल बदल होईल. शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. भावंडांकडून काही लाभ प्राप्ती होईल. आणखी वाचा
सिंह - आज चंद्र सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपल्या दृढ आत्मविश्वासाने प्रत्येक कामात आपण यशस्वी होऊ शकाल. मात्र, आपणास मन शांत ठेवावे लागेल. सरकारी कामातून फायदा होईल. कुटुंबियांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. खर्चात मात्र वाढ होईल. उपाय:-सूर्याच्या कोणत्याही एका मंत्राचा रोज जप करावा. आणखी वाचा
कन्या - आज चंद्र सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज भावनेच्या भरात आपल्या हातून एखादी मोठी चुक घडू शकेल. वाद होतील. दुपार नंतर मात्र आत्मविश्वास वाढेल. सामाजिक मान - प्रतिष्ठेत वाढ होईल. रागावर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल. उपाय:-रोज सूर्याष्टकाचे पठण करावे. आणखी वाचा
तूळ - आज चंद्र सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. मित्रांसह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. त्यांच्याकडून एखादा फायदा संभवतो. व्यापारात लाभ होईल. कुटुंबियांशी सौहार्दाचे संबंध राहतील. दुपार नंतर मात्र शारीरिक व मानसिक आरोग्य नाजूक होईल. वाद होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा
वृश्चिक - आज चंद्र सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. दृढ मनोबल व आत्मविश्वासाच्या जोरावर आज आपली सर्व कामे आपण सहजपणे पूर्ण करू शकाल. नोकरी - व्यवसायात आपल्या बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल. नोकरीत आपल्या कामगिरीवर वरिष्ठ खुश होतील व त्यामुळे आपल्या पदोन्नतीची शक्यता वाढेल. वडिलधार्यांशी आपले संबंध सौहार्दाचे होतील. तसेच त्यांच्या कडून एखादा फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणखी वाचा
धनु - आज चंद्र सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आपण सकाळी एखाद्या मंगल कार्यात सहभागी व्हाल. एखादे नुकसान होण्याच्या शक्यतेमुळे आपणास रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. आपली कामे सहजपणे होतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. पदोन्नती संभवते. आणखी वाचा
मकर - आज चंद्र सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज सकाळी प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. मनात नकारात्मक विचार थैमान घालतील. अचानकपणे खर्चात वाढ होईल. दुपार नंतर परिस्थितीत सुधारणा होऊ लागेल. एखादा प्रवास संभवतो. मनःशांती लाभेल. रागावर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल. सूर्य आपल्या व्ययस्थानी आहे. आणखी वाचा
कुंभ - आज चंद्र सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज व्यापारी आणि भागीदार यांच्याबरोबर जपून वागावे लागेल. वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होईल. विद्यार्थ्यांची प्रगती होईल. घरातील वातावरण समाधानाचे राहील. दैनंदिन कामात अडचणी येतील. नोकरीत वरिष्ठांशी वाद संभवतो. खूप परिश्रम करुनही अपेक्षित प्राप्ती होणार नाही. आणखी वाचा
मीन - आज चंद्र सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा आपला दिवस मध्यम फलदायी आहे. कुटुंबातील व्यक्तींशी सुसंवाद राहील. दैनंदिन कामास विलंब होईल. सहकार्यांचे सहकार्य अल्प प्रमाणात मिळेल. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद संभवतात. जोडीदाराच्या प्रकृतीची चिंता निर्माण होईल. आणखी वाचा