आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 07:21 IST2025-10-04T07:19:55+5:302025-10-04T07:21:59+5:30

Todays Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope - October 4, 2025: Pay attention to investing money, give up the desire for high profits | आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा

आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा

मेष - आज चंद्र 04 ऑक्टोबर, 2025 शनिवार च्या दिवशी कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस मित्र व सामाजिक कार्ये ह्यांच्यासाठी धावपळ करण्यात जाईल. पैसा सुद्धा खर्च होईल. नवीन मित्रांच्या ओळखी होतील. भविष्यात त्यांचा उपयोग होईल. सरकारी कामे सफल होतील. मोठयांचा सहवास लाभेल, त्यांना भेटून आनंद होईल. दूर किंवा विदेशात असलेल्या संततीची काही आनंददायी बातमी मिळेल किंवा भेट होईल. आणखी वाचा

वृषभ - आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विशेषतः व्यापार - व्यवसाय करणार्यांना आजचा दिवस अत्यंत लाभदायक आहे. नोकरीत पदोन्नती संभवते. कार्यालयात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कौटुंबिक जीवनात सुख शांती मिळेल. आणखी वाचा

मिथुन- आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आज आपणास मानसिक व्यग्रता व शारीरिक शिथिलता अनुभवास येईल. काम करायला उत्साह वाटणार नाही. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांचे सहकार्य मिळणार नाही. पैसा खर्च होईल. संतती बरोबर मतभेद होतील किंवा त्यांच्या चिंतेत मन व्यग्र राहील. आणखी वाचा

कर्क -  आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज प्रत्येक गोष्टीत जपून व्यवहार करावा लागेल. कुटुंबियांशी वाद संभवतात. वाणी व संतापावर नियंत्रण ठेवल्यास संभाव्य कटुता टाळू शकेल. खर्च वाढण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

सिंह - आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज पति - पत्नीत मतभेद होऊन कटुता निर्माण होईल. दोघां पैकी एकाचे स्वास्थ्य बिघडणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. सांसारिक किंवा इतर प्रश्नांमुळे मन उदास राहील. सामाजिक क्षेत्रात अपयशी व्हाल. भागीदारांशी सुद्धा मतभेद होऊ शकतात. आणखी वाचा 

कन्या -  आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज कुटुंबात आनंद व उत्साहाचे वातावरण राहिल्याने आपले मन प्रसन्न राहील. स्वास्थ्य सुद्धा उत्तम राहील. आजारी व्यक्तीची तब्बेत सुधारेल. कामात यश मिळेल. कार्यालयात सहकारी मदत करतील. व्यापार - व्यवसायात प्रतिस्पर्धी व विरोधक यांचेकडून नुकसान होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

तूळ - आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपण आपली कल्पनाशक्ती व सृजनशीलता चांगल्या प्रकारे कामी आणाल. बौद्धिक कामे तथा चर्चा ह्यात भाग घेणेआपणास आवडेल. संततीकडून चांगल्या बातम्या मिळतील. त्यांची प्रगती होईल. स्त्री मित्रांचे सहकार्य मिळेल. प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंद होईल. विचारांच्या आधिक्याने मन विचलित होईल.आणखी वाचा

वृश्चिक - आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आजचा दिवस आपण शांतपणे घालवाल. शारीरिक स्वास्थ्य बिघडल्याने आपण मानसिक दृष्टया बेचैन राहाल. आईच्या प्रकृतीची चिंता राहील. कुटुंबियांशी मतभेद झाल्याने मनास यातना होतील. स्थावर संपत्ती व वाहन इत्यादींच्या व्यवहाराशी निगडित कागदपत्रावर सही करताना सावध राहा. आणखी वाचा

धनु -  आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज आपणास गूढ व रहस्यमय विषयांची गोडी लागल्याने त्या विषयात खोलवर उतरण्याचा आपण प्रयत्न कराल. नवीन कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. प्रकृती उत्तम राहील व मन प्रसन्न राहील. जवळपासचे प्रवास घडतील. मित्र व नातेवाईक ह्यांचा सुखद सहवास घडेल. नशिबाची साथ लाभेल. आणखी वाचा

मकर -  आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज 'मौनं सर्वार्थ साधनं' ही गोष्ट लक्षात ठेवून वाणीवर ताबा ठेवला तर अनर्थ घडणार नाही. कुटुंबियांशी मतभेद होऊ नयेत म्हणून ह्याची आवश्यकता आहे. विद्यार्थिवर्गाला अभ्यासासाठी परिश्रम घ्यावे लागतील. नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका. स्वास्थ्य साधारण राहील. आणखी वाचा

कुंभ -आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस शारीरिक, मानसिक व आर्थिक अशा सर्व दृष्टीनी चांगला आहे. कुटुंबीयांसह रुचकर भोजनाचा आस्वाद घ्याल. मित्रांसह बाहेर फिरायला जाण्याचा बेत ठरेल. दांपत्य जीवनातील आनंद उपभोगू शकाल. भेटवस्तूंची प्राप्ती व धनप्राप्ती होईल.  आणखी वाचा

मीन - आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज कमी वेळात जास्तीत जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा व पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या. चित्ताची एकाग्रता कमी राहील. शरीर स्वास्थ्य बिघडेल. संततीची समस्या चिंतेत टाकील. स्वकीयां पासून दूर जाण्याचे प्रसंग येतील. परोपकारी कार्यावर खर्च होईल. महत्वाची कागदपत्रे किंवा कोर्ट - कचेरीतील प्रकरणे ह्या पासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. आणखी वाचा

Web Title : आज का राशिफल: निवेश पर ध्यान दें, जल्दी लाभ का लालच छोड़ें।

Web Summary : 4 अक्टूबर, 2025: राशिफल के अनुसार मिथुन राशि को चुनौतियों का सामना करना पड़ सकता है, जबकि वृषभ राशि के जातकों के लिए व्यापार में लाभ का दिन है। मीन राशि के जातकों को निवेश के प्रति सावधान रहने की सलाह दी जाती है।

Web Title : Daily Horoscope: Focus on investments, avoid greed for quick gains.

Web Summary : October 4, 2025: Varied experiences for zodiac signs. Gemini may face challenges, while Taurus enjoys a favorable day for business. Pisces advised caution with investments.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app