Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य- २५ नोव्हेंबर २०२२: मिथुनराशीसाठी सुखाचा दिवस, तर सिंह राशीनं उक्ती आणि कृतीवर संयम ठेवावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 07:24 IST2022-11-25T07:24:10+5:302022-11-25T07:24:49+5:30

Today's Horoscope- November 25, 2022: कसा असेल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी वाचा तुमचं आजचं राशीभविष्य...

Todays Horoscope November 25 2022 A day of happiness for Gemini while Leo should be restrained in words and actions | Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य- २५ नोव्हेंबर २०२२: मिथुनराशीसाठी सुखाचा दिवस, तर सिंह राशीनं उक्ती आणि कृतीवर संयम ठेवावा 

Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य- २५ नोव्हेंबर २०२२: मिथुनराशीसाठी सुखाचा दिवस, तर सिंह राशीनं उक्ती आणि कृतीवर संयम ठेवावा 

मेष: आज सांसारिक बाबीं पासून दूर राहण्याचे विचार मनात येतील. ह्या विचारांमुळे एखाद्या गूढ किंवा रहस्यमय विषयाचा छंद लागेल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल. असे असले तरीही बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. आणखी वाचा...

वृषभ: आज कुटुंबीयांसह सामाजिक कार्यात किंवा एखाद्या पर्यटन स्थळी प्रवासाला जाण्याचा आनंद लुटाल. व्यापार्‍यांना व्यापारात वाढ होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा...

मिथुन: आजचा दिवस कार्यपूर्ती, यश व कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. घरात सुखाचे व शांतीचे वातावरण राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. आज खर्च होईल पण तो अनावश्यक वाटणार नाही. आणखी वाचा...

कर्क: आजचा दिवस शारीरिक ढिलेपणाचा व मानसिक तापाचा आहे. मित्र व संतती विषयक काळजी राहील. अचानक पैसा खर्च करावा लागेल. वादग्रस्त विषय आज टाळावेत. शक्य असेल तर प्रवास सुद्धा करू नका. आणखी वाचा...

सिंह: आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. उक्ती व कृती ह्यावर संयम ठेवल्यास संभाव्य वाद टाळू शकाल. आईशी मतभेद होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा...

कन्या: आजचा दिवस शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता ह्यामुळे मनाला शांतता मिळवून देणारा आहे. कार्यात यश मिळेल. कुटुंबीय व मित्रपरिवार ह्यांच्याशी असलेल्या संबंधात गोडवा वाढेल. आणखी वाचा...

तूळ: आज आपल्या द्विधा मनःस्थितीमुळे कोणत्याही निर्णयाप्रत येणे आपणास जमणार नाही. महत्वाच्या कामाची सुरुवात करायला दिवस प्रतिकूल आहे. कामात आपल्या आळशीपणामुळे आपणाला दुःख होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा...

वृश्चिक: आज शारीरिक व मानसिक प्रसन्नता लाभेल. घरात सुखा - समाधानाचे वातावरण राहील. मित्र व स्नेही यांच्या भेटीने आनंद होईल. आणखी वाचा...

धनु: रागावर पण नियंत्रण ठेवा, अन्यथा कोणाशी वादविवाद होतील. मानसिक चिंतेत राहाल. एखादा अपघात संभवतो. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल. कुटुंबीयांशी मतभेद होतील. प्रकृती सुद्धा बिघडू शकेल. आणखी वाचा...

मकर: आज विविध क्षेत्रातून लाभ होण्याचा दिवस असल्याने सामाजिक कार्यांतून लाभ होईल. मित्र व स्नेही यांच्या भेटीतून लाभ होईल. विवाहोत्सुकांचे विवाह सहज जुळतील. शुभ प्रसंगाचे आयोजन घडेल. पत्नी व संततीचा सहवास लाभेल. आणखी वाचा...

कुंभ: आज शारीरिक व मानसिक स्थिती चांगली राहील. व्यवसायात आपल्या कामाचे कौतुक होईल. त्यामुळे आनंद होईल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांचे चांगले सहकार्य मिळेल. समाजात मान - सन्मान प्राप्त होतील. आणखी वाचा...

मीन: आज वरिष्ठांशी मतभेद होतील. शारीरिक कंटाळा व मानसिक चिंता राहील. शक्यतो प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद टाळा. वैचारिक पातळीवर नकारात्मकता काढून टाका व मानसिक स्वास्थ्य मिळविण्याचा प्रयत्न करा. आणखी वाचा...

Web Title: Todays Horoscope November 25 2022 A day of happiness for Gemini while Leo should be restrained in words and actions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app