आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 07:10 IST2025-05-02T07:09:58+5:302025-05-02T07:10:51+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope, May 2, 2025: You will not be able to take advantage of the opportunity that comes your way | आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही

आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही

मेष: 02 मे, 2025 शुक्रवारी मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या तिसरा असेल. आज आपल्या विचारांची अस्थिरता आपणास अडचणीत आणेल. नोकरी - व्यवसायाच्या क्षेत्रात स्पर्धात्मक वातावरण राहील, ज्यातून बाहेर पडण्यात आपण यशस्वी व्हाल. नवी कामे करायला प्रेरीत व्हाल. लहान प्रवासाची शक्यता आहे. बौद्धिक किंवा लेखन कार्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आणखी वाचा 

वृषभ: आपणास ठाम निर्णय घेऊ देणार नाही. त्यामुळे हाती आलेल्या संधीला मुकावे लागेल. फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता आहे. लेखक, कारागीर, कलावंत ह्यांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. आज आपल्या वाक्चातुर्याने आपण यशस्वी व्हाल व त्याचा इतरांवर सुद्धा प्रभाव होईल. आणखी वाचा 

मिथुन:आजच्या दिवसाचा प्रारंभ शरीर व मनाच्या टवटवीतपणामुळे चांगला होईल. मित्र व कुटुंबीयांसह घरात किंवा बाहेर मनपसंत भोजनाचा आनंद लुटाल. सुंदर कपडे परिधान करून बाहेर जाल. आर्थिक लाभाची संधी आहे. मनात कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक विचारांना थारा न देणे किंवा ते दूर करणे हितावह राहील. आणखी वाचा 

कर्क: आज मनःस्थिती त्रिशंकू अवस्थेत असल्यामुळे कोणताही महत्वाचा निर्णय आपण घेऊ शकणार नाही. संबंधित व्यक्तींशी मतभेद संभवतात. प्रापंचिक कार्यावर खर्च होईल. वाणीवर संयम ठेवावा लागेल. मनातील साशंकता दूर करावी लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा  

सिंह: कोणत्याही गोष्टीत खंबीर मनाने निर्णय घेऊ न शकल्याने समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही. मन विचारांत अडकून पडेल. मित्रांकडून व विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल. व्यापारात फायदा होईल. मनःस्थिती चांगली नसल्याने महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नये. संततीशी चर्चा होईल. आणखी वाचा  

कन्या: सांप्रतकाली नव्या कामा संदर्भातील नियोजन योग्य प्रकारे करू शकाल. व्यापारी व नोकरी करणाऱ्यांना आजचा दिवस लाभदायी आहे. वरिष्ठांची मर्जी संपादन करता आल्यामुळे बढती मिळण्याची शक्यता आहे. व्यापारात लाभ संभवतो. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. कौटुंबिक जिव्हाळा वाढेल. आणखी वाचा 

तूळ: व्यावसायिक क्षेत्रात लाभ संभवतात. नोकरी व व्यापारात सहकारी सहकार्य करणार नाहीत. दूरवरच्या प्रवासाचे आयोजन करू शकाल. लेखनकार्य व बौद्धिक क्षेत्रात सक्रिय राहाल. परदेशातून मित्र व नातलगांकडून आनंददायी बातमी मिळेल. आणखी वाचा 

वृश्चिक: सध्या शांत राहून वेळ घालवावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अवैध कामांपासून दूर राहावे. नवे संबंध विचारपूर्वक प्रस्थापित करा. जास्त पैसे खर्च झाल्याने आर्थिक चणचण भासेल. काम वेळेवर पूर्ण होणार नाही. खाण्या- पिण्याविषयी काळजी घ्यावी लागेल. शारीरिक व मानसिक बेचैनी जाणवेल. आणखी वाचा  

धनु: आजचा दिवस आनंदात जाईल. मनोरंजनाच्या प्रसंगातून मन आनंदी राहील. भिन्नलिंगी व्यक्तीच्या सहवासातून आनंद मिळेल. मित्रांसह एखादा प्रवास, एखादी सहल ठरवाल. लेखन कार्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आणखी वाचा 

मकर: व्यापारातील प्रगतीसाठी आजचा दिवस लाभदायी आहे. व्यवसायात आपण ठरविल्या प्रमाणे काम करु शकाल. आर्थिक देवाण - घेवाणीत सुद्धा यश मिळवू शकाल. व्यापारी कामात विघ्न येईल. स्वास्थ्य उत्तम राहील. घरात सुख - शांतीचे वातावरण राहील. आणखी वाचा 

कुंभ: आपले विचार व बोलणे ह्यात बदल होईल. बौद्धिक चर्चेत सहभागी होऊ शकाल. लेखन व सृजनात्मकता ह्यातून आनंद मिळेल. अचानक खर्च उदभवतील. आणखी वाचा 

मीन :आज आपल्यात स्फूर्ती व उत्साहाचा अभाव असल्याचे दिसून येईल. शक्यतो कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत. शरीर व मन अस्वस्थ राहील. अप्रिय घटनांतून आपले मन दुःखी होईल. नोकरीत काळजीचे वातावरण राहील.  आणखी वाचा   

Web Title: Today's Horoscope, May 2, 2025: You will not be able to take advantage of the opportunity that comes your way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app