आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 07:27 IST2025-05-15T07:26:53+5:302025-05-15T07:27:41+5:30

Rashi Bhavishya in Marathi: चंद्र आज 15 मे, 2025 गुरूवार च्या दिवशी वृश्चिक राशीत आहे.

Today's Horoscope May 15, 2025: Financial gains are possible, but the luck of many will change after noon... | आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...

आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...

मेष - सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. संततीच्या बाबतीत मात्र आपली द्विधा मनःस्थिती होईल. आणखी वाचा 

वृषभ - एखाद्या सहलीचे आयोजन यशस्वीपणे करू शकाल. परंतु दुपार नंतर वाद होण्याची शक्यता असल्याने बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. आणखी वाचा

मिथुन - शारीरिक स्फूर्ती व मानसिक प्रसन्नता लाभेल. अपूर्ण कामे पूर्णत्वास गेल्याने आनंदात वाढ होईल. आणखी वाचा

कर्क  - एकाग्रतेने काम केल्यामुळे कामात यश जरूर मिळेल. वाद होण्याची शक्यता आहे.  आणखी वाचा

सिंह - आईच्या प्रकृतीची चिंता राहील. आर्थिक हानी होऊ शकते. तरीही दुपार नंतर आर्थिक योजनांवर विचार कराल. आणखी वाचा

कन्या -  आर्थिक लाभ संभवतात. आजचा दिवस नवीन कार्याचा आरंभ करायला अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. आणखी वाचा

तूळ - आज एखाद्या धार्मिक कार्यावर खर्च होण्याची शक्यता आहे. दुपार नंतर प्रसन्नतेचा अनुभव घ्याल. आर्थिक लाभ होईल. आणखी वाचा

वृश्चिक - घरात आनंद व उत्साहाचे वातावरण राहील. संताप होऊ देऊ नका. स्नेहीजनांच्या सहवासाचा आनंद घ्या. आणखी वाचा

धनु -  शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य राहील. आज शक्यतो शस्त्रक्रिये सारख्या बाबी टाळणे हितावह राहील. दुपार नंतर कामे यशस्वी होतील. आणखी वाचा

मकर - आज सामाजिक प्रसिद्धी मिळाल्याने व्यावसायिक व आर्थिक दृष्टया काही लाभ होतील. दुपार नंतर सावध राहावे लागेल. आणखी वाचा

कुंभ - आज आपला मान-सन्मान झाल्याने काही धनलाभ होईल. प्रत्येक काम सहजगत्या पूर्ण होईल. आणखी वाचा

मीन - नोकरीत वरिष्ठ व प्रतिस्पर्धी ह्यांच्याशी निष्कारण वाद होण्याची शक्यता आहे. प्रवास संभवतात. आणखी वाचा  

Web Title: Today's Horoscope May 15, 2025: Financial gains are possible, but the luck of many will change after noon...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app